केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत देशभरात 3 कोटी घरे बांधण्याचा निर्धार केला आहे. या योजनेंतर्गत देशातील नागरिकांना पक्की घरे उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे. तुम्ही जर बेघर असाल अथवा कच्चा घरात राहत असल्यास काळजी करण्याचे कारण नाही. पंतप्रधान आवास योजनेचे (ग्रामीण) सर्वेक्षण पुन्हा सुरू झाले असून, लाभार्थी घरबसल्या यासाठी नोंदणी करू शकतात.
तुम्ही या योजनेशी संबंधित अधिक माहिती पंचायत सचिव किंवा गट विकास अधिकाऱ्याकडून जाणून घेऊ शकता. तसेच, Awaasplus सर्वेक्षण ॲप (Awaasplus 2024 survey) आणि AadhaarFaceRD ॲप्सच्या माध्यमातून नोंदणी देखील करता येईल. तुमच्या
Awaasplus सर्वेक्षण ॲप कसे डाऊनलोड करू शकता?
यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम पंतप्रधान आवास योजनेची (ग्रामीण) (Pradhan Mantri Awas Yojana) अधिकृत वेबसाइट pmayg.nic.in वर जावे लागेल.
वेबसाइटवर गेल्यानंतर AwaasPlus2024 Survey new वर क्लिक करा. त्यानंतर ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक दिसेल. त्यावर क्लिक करून ॲप डाऊनलोड करू शकता. हे ॲप पूर्णपणे मोफत आहे.
पंतप्रधान आवास योजनेसाठी (Pradhan Mantri Awas Yojana) अर्ज कसा करावा?
तुम्ही AwaasPlus2024 Survey ॲप अथवा http://pmaymis.gov.in वेबसाइटवरून योजनेसाठी अर्ज करू शकता. वेबसाइटवर गेल्यावर तुम्हाला आधी नोंदणी करावी लागेल. त्यानंतर तुमचे नाव, पत्ता, आधार क्रमांक, उत्पन्न, घरातील सदस्यांची माहिती, घर कच्चे आहे की पक्के, घरातील खोल्यांची संख्या, तुमच्याकडे कोणती गाडी आहे, असे अनेक प्रश्न विचारले जातील. ही माहिती भरून तुम्ही अर्ज जमा करू शकता.
कागदपत्रे
· पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे पुढील कागदपत्रे असायला हवी.
· आधार कार्ड
· कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड
· बँक खात्याची माहिती
· मनरेगा जॉब कार्ड
· मोबाइल नंबर
· उत्पन्नाचा दाखला
· घराशी संबंधित इतर कागदपत्रे