PM किसान योजनेचा 19वा हफ्ता बँक खात्यात कधी जमा होणार? वाचा

PM Kisan Samman Nidhi Yojana : देशात आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. यापैकीच एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana). ही योजना भारत सरकारने 2019 मध्ये सुरू केली होती.

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम 4 महिन्यांच्या ठराविक अंतराने दिली जाते. आतापर्यंत या योजनेचे 18 हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून, लवकरच पुढील हफ्त्याचे देखील पैसे मिळणार आहेत.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) 19वा हफ्ता कधी मिळणार?

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) 19वा हफ्ता शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात मिळू शकतो. याआधीचा हफ्ता ऑक्टोबरमध्ये जारी करण्यात आला होता. त्यामुळे 4 महिन्यांच्या टप्प्यानंतर फेब्रुवारी महिन्यात पुढील हफ्ता खात्यात जमा केला जाऊ शकतो. आतापर्यंत, 3.46 लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत. पुढील हफ्त्याचे पैसे केवळ केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.

ई-केवायसी कसे करू शकता?

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला pmkisan.gov.in  या वेबसाईटवर जावे लागेल. येथे तुम्हाला फार्मर्स कॉर्नर पर्याय दिसेल. तेथे तुम्हाला तुम्हाला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल त्यानंतर तुमच्यावर फोनवर एक ओटीपी येतो. हा ओटीपी व्हेरिफाय करून घरबसल्या ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येईल.