NTPC Vacancy: तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने (NTPC) इंजिनियरिंग एक्झिक्युटिव्हनंतर असिस्टंट एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन्स या 400 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. 15 फेब्रुवारीपासून या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार 1 मार्च पर्यंत ntpc.co.in वर जाऊन या पदासाठी अर्ज करू शकतात.
पात्रता
इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनीअरिंग मध्ये बी.टेक झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. यासाठी कमाल वयामर्यादा 35 वर्ष आहे. तर एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयात 5 वर्षे आणि ओबीसी प्रवर्गातील 03 वर्ष सूट मिळेल.
अर्ज शुल्क
सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 300 रुपये आहे. तर एससी, एसटी, दिव्यांग (PwBD), माजी सैनिक (XSM) आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही.
अर्ज करण्याची प्रक्रिया
- इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी एनटीपीसीच्या WWW.ntpc.co.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर करिअर सेक्शनध्ये EET-2025 भरती यावर क्लिक करा.
- आता नोंदणी पूर्ण करून आवश्यक माहिती भरा व कागदपत्रं अपलोड करा.
- त्यानंतर शुल्क भरून अर्ज सबमिट करा. अधिक माहितीसाठी तुम्ही वेबसाइटवर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात पाहू शकता.