NEET UG-2025 : तुम्ही वैद्यकीय परीक्षेची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने NEET UG-2025 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. जे विद्यार्थी नीट परीक्षेसाठी अर्ज करू इच्छितात, ते अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करू शकतात.
ही परीक्षा MBBS, BDS, BVSc, AH, आयुष आणि BSc नर्सिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 4 मे 2025 रोजी होणार आहे. पात्र उमेदवार 7 फेब्रुवारी ते 7 मार्च 2025 या कालावधीत अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर अर्ज सादर करू शकतात.
परीक्षेच्या महत्त्वाच्या तारखा
विद्यार्थी 7 फेब्रुवारी ते 7 मार्च 2025 या कालावधीत अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वरून अर्ज करू शकतात. परीक्षा 4 मे 2025 रोजी होईल. तर निकालाची संभाव्य तारीख 14 जून आहे. परीक्षेच्या काही दिवस आधी हॉल तिकीट जारी केले जाईल.
परीक्षा पॅटर्न
या वेळी परीक्षा COVID-19 पूर्वीच्या पॅटर्ननुसार घेतली जाईल. म्हणजेच, यावेळी परीक्षेत सेक्शन-B नसेल. पेपरमध्ये एकूण 180 प्रश्न असतील, ज्यामध्ये फिजिक्सचे 45 प्रश्न, केमिस्ट्रीचे 45 प्रश्न आणि बायोलॉजीचे 90 प्रश्न असतील. विद्यार्थ्यांना ही परीक्षा पूर्ण करण्यासाठी 180 मिनिटे (3 तास) दिले जातील. यावेळी विद्यार्थ्यांना सर्व विभागांचे प्रश्न सोडवावे लागतील. प्रत्येक योग्य उत्तरासाठी 4 गुण दिले जातील.
अर्ज शुल्क
सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे शुल्क 1700 रुपये आहे. EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी हे शुल्क 1600 रुपये ठेवण्यात आले आहे. SC, ST, PWD आणि तृतीयपंथीय उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क 1000 रुपये आहे. परदेशी केंद्रांसाठी अर्जदारांना 9500 रुपये भरावे लागतील.
अर्जाची प्रक्रिया
1. neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. नाव, संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडी प्रदान करून नोंदणी करा.
3. लॉग इन करून आवश्यक माहिती भरा
4. आवश्यक दस्तऐवजांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
5. त्यानंतर उपलब्ध पर्यायांमधून परीक्षेसाठी केंद्र निवडा.
6. क्रेडिट/डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे नोंदणी शुल्क भरा.
7. अर्जातील माहिती तपासून सबमिट करा.