NEET PG 2025 Exam Date | नॅशनल बोर्ड ऑफ एग्जामिनेशन इन मेडिकल सायन्सेसने (NBEMS) पोस्ट-ग्रॅज्युएशन (NEET PG) 2025 साठी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेची घोषणा केली आहे. NEET PG 2025 परीक्षा 15 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
डॉक्टरांसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा देणे अनिवार्य असते. या परीक्षेच्या माध्यमातून एमडी , एमएस, डिप्लोमा (Diploma) आणि इतर काही मेडिकल कोर्ससाठी प्रवेश घेता येतो.
NBEMS च्या अधिकृत घोषणेनुसार, NEET PG 2025 साठी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा 15 जून 2025 रोजी होणार आहे. ही संगणक आधारित परीक्षा असेल. नीट पीजी 2025 परीक्षा देशभरातील विविध केंद्रांवर दोन सत्रांमध्ये आयोजित केली जाईल. पहिल्या सत्राची वेळ सकाळी 9:00 ते दुपारी 12:30 दरम्यान असेल, तर दुसरे सत्र दुपारी 3:30 ते संध्याकाळी 7:00 वाजेपर्यंत घेतले जाईल.
परीक्षा झाल्यानंतर मेडिकल काउंसिलिंग कमिटी (MCC) अखिल भारतीय कोटा (AIQ) अंतर्गत 50% जागांसाठी काउन्सिलिंग प्रक्रियेचे व्यवस्थापन करेल, तर उर्वरित 50% राज्य कोटा जागांचे व्यवस्थापन संबंधित राज्य काउन्सिलिंग प्राधिकरण करेल. काउंसलिंग प्रक्रियेमध्ये नोंदणी, पर्याय निवड, जागा वाटप आणि निश्चित झालेल्या संस्थांमध्ये हजर राहण्याचे अनेक टप्पे असतील.
NBEMS कडून लवकरच आपल्या अधिकृत वेबसाइटवर (natboard.edu.in) माहितीपत्रक प्रसिद्ध केले जाईल. यामध्ये पात्रता निकष, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, अर्ज प्रक्रिया आणि अन्य महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना दिल्या जातील.माहितीपत्रक जारी केल्यानंतर लवकरच ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल.