शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आजपासून खात्यात जमा होणार नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता

Namo Shetkari Yojana | राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा (Namo Shetkari Yojana 6th installment) सहावा हप्ता आजपासून बँक खात्यात जमा होण्यास सुरूवात होणार आहे. राज्य सरकारने या हप्त्यासाठी 2,169 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या योजनेची रक्कम 31 मार्चपर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.  

या हप्त्यात किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार?  

राज्यातील 93.26 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा सहावा हप्ता मिळणार आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात 2,000 रुपये थेट (DBT) पद्धतीने जमा केले जातील. 

 नमो शेतकरी योजना ((Namo Shetkari Yojana) काय आहे?  

राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. ही योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसह (PM-Kisan) एकत्रित केली जाते. यामुळे राज्य सरकारकडून मिळणाऱ्या वार्षिक 6,000 रुपयांसोबतच, केंद्र सरकारकडून मिळणारे 6,000 रुपये मिळून शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते.  

या योजनेचा शेतकऱ्यांना काय फायदा होतो?  

  • शेतीसाठी आर्थिक मदत – बियाणे, खते, सिंचन आणि शेतीच्या इतर गरजा भागवण्यासाठी थेट मदत मिळते.  
  • पीक उत्पादनात सुधारणा – आर्थिक सहाय्यामुळे शेतकऱ्यांना चांगली गुंतवणूक करता येते, ज्यामुळे उत्पादन वाढू शकते.  
  • कर्जाचा भार कमी होतो – शेतकऱ्यांना लहान-मोठ्या खर्चासाठी सावकारांवर अवलंबून राहावे लागत नाही.  
  • सरकारी योजनांचा थेट लाभ – शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे थेट जमा होतात, त्यामुळे कोणत्याही दलालांचा हस्तक्षेप होत नाही.  

पैसे खात्यात आले का? असे तपासा!  

PM-Kisan आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे खात्यात आले आहेत की नाही, हे तपासण्यासाठी बँक स्टेटमेंट किंवा PM-Kisan अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून खात्याची स्थिती पाहू शकता. आधार आणि बँक खाते क्रमांक जोडले असतील, तर पैसे वेळेवर जमा होतील.