MI vs KKR IPL 2025 | इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 मधील 12 वा सामना आज (31 मार्च) मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) या हंगामातील पहिल्या विजयाची प्रतीक्षा असून, पराभवाच्या मालिकेनंतर त्यांचा संघ विजयी कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. तर, कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) मागील सामना जिंकला असल्याने त्यांना विजयी लय कायम ठेवायची आहे.
वानखेडे स्टेडियम: फलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टी (Mumbai Indians vs Kolkata Knight Riders)
वानखेडे स्टेडियमवर मोठ्या धावसंख्यांचे सामने होण्याची शक्यता असते. लाल मातीच्या खेळपट्टीमुळे आणि लहान सीमारेषेमुळे फलंदाजांसाठी हे मैदान (MI vs KKR IPL 2025 Pitch Report) अनुकूल ठरते. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देऊ शकतो.
मुंबई इंडियन्सचा वानखेडेवरील रेकॉर्ड
वानखेडे स्टेडियम हे मुंबई इंडियन्ससाठी नेहमीच मजबूत गड राहिले आहे. या मैदानावर त्यांनी एकूण 85 सामने खेळले असून, त्यापैकी 51 सामने जिंकले आहेत. घरच्या मैदानावर चाहत्यांच्या उपस्थितीत त्यांची कामगिरी प्रभावी राहिली आहे. मात्र, 33 सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे, तर 1 सामना बरोबरीत राहिला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सची वानखेडेवरील आकडेवारी
कोलकाता नाईट रायडर्ससाठी वानखेडेवरील आकडे फारसे अनुकूल राहिलेले नाहीत. त्यांनी या मैदानावर आतापर्यंत 17 सामने खेळले असून, त्यापैकी फक्त 5 सामने जिंकले आहेत. उर्वरित 12 सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे वानखेडेवरील त्यांचा रेकॉर्ड सुधारण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल.
सामन्याची वेळ आणि थेट प्रक्षेपण (MI vs KKR IPL 2025 match time)
- नाणेफेक: सायंकाळी 7:00 वाजता
- सामना सुरू: सायंकाळी 7:30 वाजता
- थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
- लाईव्ह स्ट्रीमिंग: जिओहॉटस्टार ॲप
संभाव्य अंतिम 11 खेळाडू
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, कोर्बिन बॉश, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, विघ्नेश पुथुर.
कोलकाता नाईट रायडर्स: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, हर्षित राणा, स्पेन्सर जॉन्सन, वरुण चक्रवर्ती.