मिड-रेंजमध्ये दमदार स्मार्टफोन! Motorola Edge 60 Fusion ची भारतात एन्ट्री, पाहा किंमत आणि फीचर्स

Motorola ने आपला नवीन प्रीमियम मिड-रेंज स्मार्टफोन Motorola Edge 60 Fusion भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Edge 50 Fusion चा अपग्रेडेड वेरिएंट असून, यात अधिक ताकदवान MediaTek Dimensity 7400 प्रोसेसर आणि सुधारित फीचर्स देण्यात आले आहेत. Motorola Edge 60 Fusion स्मार्टफोनविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Motorola Edge 60 Fusion ची किंमत

Motorola Edge 60 Fusion दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 22,999 रुपये आहे, तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेले मॉडेल 24,999 रुपयांना खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन Flipkart आणि Motorola India च्या अधिकृत वेबसाइटवर 9 एप्रिल दुपारी 12 वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. फोन Pantone Amazonite, Pantone Zephyr आणि Pantone Slipstream या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Motorola Edge 60 Fusion चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Motorola Edge 60 Fusion मध्ये 6.7-इंचाचा pOLED ऑल-कर्व्हड डिस्प्ले दिला आहे, जो 1.5K (1220×2712 पिक्सल) रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 300Hz टच सॅम्पलिंग रेट सपोर्ट करतो. यासोबतच 4500 निट्सची पीक ब्राइटनेस क्षमता, HDR10+ सपोर्ट आणि Corning Gorilla Glass 7i चे संरक्षण मिळते. कंपनीने यात Water Touch 3.0 तंत्रज्ञानाचा देखील समावेश केला आहे.

स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7400 प्रोसेसर दिला असून, जो 12GB LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत uMCP स्टोरेजसह येतो. अधिक स्टोरेजची गरज भासल्यास 1TB पर्यंत मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट देखील उपलब्ध आहे. हा फोन Android 15 आधारित Hello UI वर चालतो.

Motorola Edge 60 Fusion च्या कॅमेरा सेटअपमध्ये 50MP चा Sony LYT700C प्रायमरी कॅमेरा दिला आहे, जो OIS आणि f/1.8 अपर्चरसह येतो. यासोबत 13MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा (f/2.2 अपर्चर) आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, जो 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग सक्षम आहे.

फोनमध्ये 5500mAh ची बॅटरी असून, ती 68W टर्बो चार्जिंगला सपोर्ट करते. ऑडिओसाठी Dolby Atmos सपोर्टेड ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे उत्तम साउंड एक्सपिरियन्स मिळतो.कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, ड्युअल-बँड Wi-Fi, Bluetooth 5.4, NFC, GPS, GLONASS, Galileo यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा समावेश आहे. सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.