Marco : ‘या’ मल्याळम चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवले, 15 दिवसातच गाठला 100 कोटींचा आकडा

Marco Box Office Collection: नववर्षाच्या सुरुवातीला अभिनेता अल्लू अर्जुनची प्रमुख भूमिका असलेल्या पुष्पा-2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवले. आता पुष्पा-2 नंतर आणखी एक दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. हा चित्रपट आहे ‘मार्को’ (Marco Movie). या मल्याळम चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. एवढेच नाही तर वरूण धवनच्या ‘बेबी जॉन’ला देखील या चित्रपटाने मागे टाकले आहे.

अभिनेता उन्नी मुकुंदनची ‘मार्को’ (Marco Movie) चित्रपटामध्ये मुख्य भूमिका आहे. तर हनीफ अदेनी यांनी हा मल्याळम भाषेतील चित्रपट दिग्दर्शित केला आहे. 20 डिसेंबर 2024 ला मार्को बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. अवघ्या 15 दिवसात चित्रपटाने 100 कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे. बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा गाठणारा हा 2024 मधील सहावा मल्याळम चित्रपट (Marco Box Office Collection) ठरला आहे.

‘मार्को’ (Marco Movie) हा आतापर्यंतचा सर्वात हिंसक भारतीय सिनेमा असल्याचे सांगितले जाते. मल्याळमसोबतच हिंदी भाषेत देखील या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे बजेट केवळ 30 कोटी रुपये आहे. चित्रपटाने आतापर्यंत केवळ भारतात मल्याळम भाषेत 37.92 कोटी रुपये, हिंदीत 5.73 कोटी रुपये आणि तेलगूमध्ये 2.1 कोटी रुपयांची कमाई करत आहे. तर जगभरातील कलेक्शनचा विचार करत हा आकडा 100 कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे.