Kumar Sangakkara & Malaika Arora | बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. कधी अभिनेता अर्जून कपूरसोबतच्या ब्रेकअपमुळे तर सोशल मीडिया पोस्टमुळे, मलायका नेहमीच चर्चे असते. नुकतेच ती IPL 2025 मधील चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये हजर होती.
सेलिब्रिटींनी क्रिकेट सामन्यांना हजेरी लावणे किंवा एखाद्या संघाला पाठिंबा देणे नवीन नाही. मात्र, यावेळी मलायका एकटी नव्हती. तिच्यासोबत राजस्थान रॉयल्सचे क्रिकेट संचालक कुमार संगकारा (Kumar Sangakkara) देखील डगआऊटमध्ये दिसला.
गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियममध्ये मलायका राजस्थान रॉयल्सच्या जर्सीमध्ये संघाच्या डगआऊटमध्ये बसलेली दिसताच सोशल मीडियावर चर्चा रंगली. अनेक युजर्स या भेटीबाबत वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले. विशेषतः, टीव्हीवर मलायका आणि संगकारा एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या कथित डेटिंगची चर्चा सुरु झाली आहे.
अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपनंतर मलायकाचे नाव अनेक लोकांसोबत जोडले गेले आहे. आता माजी क्रिकेटपटू कुमार संगकाराचे नावही चर्चेत आले आहे.
मात्र, संगकारा विवाहित असून त्याच्या पत्नीचे नाव येहाली आहे. 2003 मध्ये झालेल्या त्यांच्या लग्नाला दोन दशकांहून अधिक काळ झाला असून त्यांना दोन मुले आहेत.
कुमार संगाकाराच्या क्रिकेट कारकिर्दीकडे पाहता, तो अनेक वर्षांपासून राजस्थान रॉयल्सचे क्रिकेट संचालक आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मात्र, राहुल द्रविडच्या राजस्थान रॉयल्समधील आगमनानंतर त्यांच्या प्रशिक्षणाच्या जबाबदाऱ्या काही प्रमाणात कमी झाल्या आहेत.
मात्र, मलायका आणि संगाकारा खरंच डेट करत आहेत का हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, दोघे एकत्र दिसल्याने सोशल मीडियावर याची चर्चा रंगली आहे. एक गोष्ट नक्की की मलायका राजस्थान रॉयल्ससाठी लकी ठरली. सलग दोन पराभवानंतर संघाने चेन्नई सुपर किंग्सवर 6 धावांनी विजय मिळवला. राजस्थानचा हा या हंगामातील पहिला विजय आहे.