Mahindra XUV700 चे दमदार लूकसह नवीन एडिशन लाँच, फीचर्स-किंमत एकदा पाहाच

Mahindra XUV700 Ebony Edition |  महिंद्राने आपल्या लोकप्रिय SUV XUV700 चे खास एडिशन ग्राहकांसाठी लाँच केले आहे. कंपनीने विशेष Mahindra XUV700 Ebony Edition लाँ केले आहे. या स्पेशल एडिशनची 19.64 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.

या नवीन एडिशनमध्ये SUV ला पूर्णतः डार्क आणि स्टायलिश लुक देण्यात आला आहे, ज्यामुळे ती आधीपेक्षा अधिक आकर्षक दिसते. या दमदार SUV चे सर्व खास फीचर्स आणि अपडेट्स जाणून घेऊया.

 Mahindra XUV700 Ebony Edition ची वैशिष्टेये

नवीन स्टेल्थ ब्लॅक पेंट स्कीमअंतर्गत, पूर्वी उपलब्ध असलेल्या Napoli Black जागी आता मेटॅलिक फिनिश असलेला स्टेल्थ ब्लॅक कलर देण्यात आला आहे. SUV च्या एक्सटीरियर आणि इंटीरियरमध्ये संपूर्ण सर्व काळ्या रंगात आहेत. ग्रिल, स्किड प्लेट्स, अलॉय व्हील्स आणि इंटीरियरला ब्लॅक-आउट लुक मिळाला आहे. 

फ्रंट लुक अधिक अॅग्रेसिव्ह दिसावा यासाठी ब्लॅक-ऑन-ब्लॅक ग्रिलसह सिल्व्हर-ग्रे स्किड प्लेट देण्यात आली आहे. तसेच, दमदार आणि मस्क्युलर लुकसाठी 18-इंचाचे ऑल-ब्लॅक अलॉय व्हील्स जोडण्यात आले आहेत.

महिंद्रा XUV700 ईबोनी एडिशनमध्ये आधीप्रमाणेच 2.0-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन (200bhp, 380Nm) आणि 2.2-लीटर डिझेल इंजिन (185bhp, 420Nm) देण्यात आले आहे. हे इंजिन AWD (ऑल-व्हील ड्राईव्ह) पर्यायासह उपलब्ध आहे.

 Mahindra XUV700 Ebony Edition ची किंमत

Mahindra XUV700 Ebony Edition ला पेट्रोल आणि डिझेल दोन्ही व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 19.64 लाख रुपये असून, पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरिएंटसाठी 21.04 लाख रुपये खर्च करावे लागतील.

डिझेल मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 20.94 लाख रुपये आहे, तर डिझेल ऑटोमॅटिक व्हेरिएंटसाठी 24.14 लाख रुपये आहे.