Mahakumbh 2025: महाकुंभ मेळ्याविषयी जाणून घ्या संपूर्ण माहिती

दर 12 वर्षांनी कुंभ मेळ्याचे आयोजन केले जाते. अध्यात्मिकदृष्ट्या कुंभ मेळ्याला विशेष स्थान प्राप्त आहे. त्यातही यंदा 144 वर्षांनी महाकुंभ मेळा (Mahakumbh 2025) होणार आहे. महाकुंभमधील शाही स्नानानंतर सर्व पापांमधून मुक्तता होते, अशी मान्यता आहे. त्यामुळे हिंदू धर्मामध्ये महाकुंभला विशेष महत्त्व आहे. यंदाचा महाकुंभ मेळा कोठे व कधी आयोजित केला जाणार आहे, त्याविषयी जाणून घेऊयात.

कुंभ मेळ्याचे आयोजन कोठे केले जाते?

कुंभ मेळ्याचे आयोजन दर 12 वर्षांनी केले जाते. याचे आयोजन भारतातील प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन या शहरांमध्ये दर 12 वर्षांनी आयोजन केले जाते. या शहरातील प्रमुख नद्या म्हणजेच प्रयागराज येथे गंगा, जमुना आणि सरस्वतीचा संगम, नाशिक येथे गोदावरी, हरिद्वार येथे गंगा नदीआणि उज्जैन येथे शिप्रा नदीच्या काठी कुंभ मेळा भरतो.

महाकुंभ 2025 चे (Mahakumbh 2025) आयोजन कुठे करण्यात आले आहे?

यंदाचे वर्ष हे महाकुंभ मेळ्याचे आहे. तब्बल 144 वर्षांनंतर महाकुंभ मेळा आयोजित केला जातो. म्हणजे 12 कुंभ पूर्ण झाल्यानंतर महाकुंभचे आयोजन केले जाते. त्यामुळे यावर्षी उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्याला (Mahakumbh 2025) विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रयागराज येथे 13 जानेवारी 2025 रोजी पौष पौर्णिमेच्या दिवशी महाकुंभ मेळ्याला सुरुवात होईल, तर 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी समारोप होईल.  45 दिवसांमध्ये जगभरातून जवळपास 40 कोटी भावी प्रयागराजला भेट देण्याची शक्यता आहे.

महाकुंभ 2025 च्या (Mahakumbh 2025) शाही स्नानाच्या महत्त्वाच्या तारखा

13 जानेवारी 2025 – पौष पौर्णिमा

14 जानेवारी 2025 – मकर संक्रांती

29 जानेवारी 2025 – मौनी अमावस्या

3 फेब्रुवारी 2025 – वसंत पंचमी

12 फेब्रुवारी 2025 – माघ पौर्णिमा

26 फेब्रुवारी 2025 – महाशिवरात्री

कुंभमेळ्यातील (Mahakumbh 2025) शाही स्थानाला विशेष महत्त्व आहे. शाही स्नान कुंभातच होते. कुंभमेळ्यात जो शाही स्नान करतो, तो जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो. याने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात, अशी मान्यता आहे. हे स्नान प्रामुख्याने साधू करतात. भाविक देखील शाही स्नान करू शकतात.