MahaKumbh Mela 2025: भारतात आयोजित केल्या जाणाऱ्या कुंभमेळ्याला (MahaKumbh Mela) जगभरातील कोट्यावधी लोकं उपस्थित राहतात. हिंदू धर्मात या सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. यंदाचा कुंभमेळा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पार पडणार आहे.
यंदाचा कुंभमेळा (MahaKumbh Mela) अनेक कारणांनी महत्त्वाचा आहे. यंदा 144 वर्षांनी महाकुंभ मेळा भरणार आहे. महाकुंभ मेळा हा 12 पूर्ण कुंभ झाल्यानंतर भरतो. त्यामुळे यंदा प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्याला विशेष महत्त्व आहे. हा कुंभमेळा कधी व कुठे भरणार आहे? याविषयी जाणून घेऊया.
महाकुंभमेळा कधी आणि कुठे होणार?
कुंभमेळ्याचे (MahaKumbh Mela) आयोजन हे प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन या 4 ठिकाणी आयोजित केला जातो. दर 12 वर्षांनी याचे आयोजन केले जाते. यंदाचा कुंभमेळा (MahaKumbh Mela) उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणार आहे. यंदा 13 जानेवारी 2025 ला पौष पौर्णिमेच्या दिवशी या कुंभमेळ्याला सुरुवात होईल. तर 26 फेब्रुवारी 2025 ला महाशिवरात्रीच्या दिवशी महाकुंभ मेळ्याचा समारोप होईल.
शाही स्नानाच्या महत्त्वाच्या तारखा
- 13 जानेवारी 2025 – पौष पौर्णिमा
- 14 जानेवारी 2025 – मकर संक्रांती
- जानेवारी 2025 – मौनी अमावस्या29
- 3 फेब्रुवारी 2025 – वसंत पंचमी
- 12 फेब्रुवारी 2025 – माघ पौर्णिमा
- 26 फेब्रुवारी 2025 – महाशिवरात्री
कुंभमधील (MahaKumbh Mela) शाही स्नाला विशेष महत्त्व आहे. यादरम्यान, शाही स्नान करणाऱ्या व्यक्तींची मागच्या जन्माच्या व या जन्माच्या पापातून मुक्तता होते, असे मानले जाते. त्यामुळे कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी या तारखा महत्त्वाच्या आहेत.