Lava Shark: 6,999 रुपयात आला भारतीय कंपनीचा शानदार स्मार्टफोन, डिझाईन आयफोनसारखी; फीचर्स खूपच जबरदस्त

Lava Shark

Lava New Smartphone | भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी Lava ने अवघ्या 7 हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणारा नवीन स्मार्टफोन Lava Shark लाँच केला आहे. धमाकेदार फीचर्ससह येणाऱ्या या फोनचे डिझाइन Apple iPhone 16 Pro सारखे आहे. आयफोनप्रमाणेच या फोनच्या बॅकपॅनेलवर कॅमेरा डिझाइन देण्यात आली आहे. 

कमी किंमतीत येणाऱ्या Lava Shark मध्ये कंपनीने 5000mAh ची बॅटरी, 50 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनच्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Lava Shark स्मार्टफोनची किंमत

Lava Shark स्मार्टफोनच्या 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत फक्त 6,999 रुपये आहे. हा एक एन्ट्री लेव्हल स्मार्टफोन असून, याच्या मदतीने अनेक दैनंदिन कामे सहज करता येतील. या फोनला Titanium Gold आणि Stealth Black रंगात खरेदी करता यईल.

Lava Shark स्मार्टफोनच्या खरेदीवर कंपनी 1 वर्षाची वॉरंटी आणि फ्री होम सर्व्हिस देते.  फोनला रिटेल स्टोर्सवरून खरेदी करू शकता.

Lava Shark चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Lava Shark मध्ये 6.67-इंच HD+ पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट120Hz आहे. यात फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सल AI कॅमेरा दिला आहे. जो एलईडी फ्लॅशसह येतो. तर फ्रंटला सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. 

यात मल्टीटास्किंगसाठी UNISOC T606 प्रोसेसरसह 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्यावाढवू शकता. 5000mAh बॅटरी देण्यात आली असून, फोन 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो. 

फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. तसेच, पाण्यापासून सुरक्षेसाठी IP54 रेटिंग मिळाले आहे.