Kartik Aaryan New Movie | अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि चित्रपट निर्माता करण जोहर (Karan Johar) यांच्यातील वाद मिटल्याचे पाहायला मिळत आहे. ‘दोस्ताना 2’ चित्रपटामुळे या दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता दोघे पुन्हा एकत्र आले आहेत. काही दिवसांपूर्वीच दोघांनी ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ (Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri) या चित्रपटाची घोषणा केली होती. आता दोघेजण आणखी एका चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत.
या वेळी ते एका आगळ्या आणि हटके विनोदी चित्रपट फ्रेंचाइजीसाठी एकत्र येणार असून, ‘फुकरे’ फेम दिग्दर्शक मृगदीप सिंग लांबा या प्रोजेक्टचा भाग असणार आहेत.
रिपोर्टनुसार, या प्रोजेक्टमध्ये चित्रपटाचे तीन भाग असतील व यात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. करण जोहर आणि महावीर जैन यांच्याद्वारे चित्रपटाची निर्मिती केली जाईल.
मृगदीप सिंग लांबा बऱ्याच दिवसांपासून या संकल्पनेवर काम करत होते. कार्तिकला केंद्रस्थानी ठेवून तीन भागांची या चित्रपटाची तयार करण्यात येईल. करण जोहरला ही संकल्पना खूप आवडली आणि त्याने यासाठी तयारी दर्शवली आहे.
या चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनचे काम सुरू झाले असून, सप्टेंबर 2025 मध्ये शूटिंगला सुरुवात होईल. निर्मात्यांचे लक्ष्य हा चित्रपट 2026 च्या शेवटी प्रदर्शित करण्याचे आहे.
दरम्यान, कार्तिक आर्यनचे अनेक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.तो अनुराग बासू दिग्दर्शित ‘तू मेरी आशिकी है’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार असून, हा चित्रपट दिवाळी 2025 मध्ये प्रदर्शित होईल. त्यानंतर व्हॅलेंटाईन डे 2026 ला ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ प्रेक्षकांच्या भेटीला येईल.