Jio आणि Disney+ Hotstar च्या विलीनीकरणानंतर आता JioHotstar नावाने एक नवीन स्ट्रीमिंग सेवा लॉन्च झाली आहे. या प्लॅटफॉर्मवर आता JioCinema आणि Disney+ Hotstarचा संपूर्ण कंटेंट एकत्र पाहायला मिळणार मिळणार आहे. रिलायन्स जिओचा हा नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म थेट Netflix आणि Amazon Prime Video ला थेट टक्कर देणार आहे.
यूजर्स आधी JioCinema आणि Disney+ Hotstar कंटेंट पाहण्यासाठी वेगवेगळे अॅप डाउनलोड करावे लागत होते. मात्र, आता दोन्ही अॅपचे विलीनीकरण झाले आहे. म्हणजेच, आता या दोन वेगवेगळ्या अॅप्सवर कंटेंट पाहण्याच्या ऐवजी दोन्हींचा कंटेंट एकाच ठिकाणी पाहता येणार आहे. थोडक्यात नवीन JioHotstar सेवेमध्ये Disney+ Hotstar आणि JioCinema दोन्हींचा कंटेंट पाहता येईल आणि यासाठी वेगवेगळे पेमेंट करावे लागणार नाही.
JioHotstar ने आधी स्पोर्ट्ससह सुरुवात केली होती. आता तुम्हाला यावर IPL, ICC टूर्नामेंट्स आणि इंग्लिश प्रीमियर लीग पाहायला मिळणार आहे. याशिवाय, JioHotstar वर Disney, Warner Bros., HBO, NBCUniversal Peacock आणि Paramount यांसारख्या मोठ्या स्टुडिओंचा कंटेंटदेखील उपलब्ध असेल. यावर काही कंटेंट मोफत आहे, तर काही कंटेंट पाहण्यासाठी सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.
JioHotstar चे सबस्क्रिप्शन प्लॅन
JioHotstar ने ग्राहकांसाठी वेगवेगळे सबस्क्रिप्शन प्लॅन उपलब्ध केले आहेत. JioHotstar Mobile Plan ची किंमत 149 रुपये (3 महिने) आणि 499 रुपये (1 वर्ष) आहे, ज्यामध्ये 720p क्वालिटी आणि फक्त 1 मोबाइल डिव्हाइसवर स्ट्रीमिंगची सुविधा मिळते. मात्र, हा प्लॅन जाहिरातींसह असेल.
JioHotstar Super Plan ची किंमत 299 रुपये (3 महिने) आणि 899 रुपये (1 वर्ष) असून, यामध्ये Full HD 1080p क्वालिटी मिळते. या प्लॅनमध्ये मोबाइल, वेब, स्मार्ट टीव्ही आणि इतर डिव्हाइसवर स्ट्रीमिंग करता येईल, परंतु जाहिराती दिसतील.
JioHotstar Premium Plan ची किंमत 299 रुपये (1 महिना) आणि 1,499 रुपये (1 वर्ष) आहे. यामध्ये 4K 2160p क्वालिटीसह Dolby Vision सपोर्ट मिळतो आणि एकाच वेळी 4 डिव्हाइसवर स्ट्रीमिंग करता येते. या प्लॅनमध्ये जाहिराती नसतील, मात्र Live कंटेंटदरम्यान जाहिराती दाखवल्या जातील.