SRH vs KKR, IPL 2025 | इंडियन प्रीमियर लीगचा (IPL2025) दुसरा आठवडा सुरू असताना स्पर्धेतील रोमांच अधिकच वाढला आहे. आतापर्यंत झालेल्या 14 सामन्यांमध्ये प्रेक्षकांना थरारक लढतींचा अनुभव मिळाला आहे. आज (3 एप्रिल) IPL 2025 चा 15 वा सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर रंगणार आहे.
दोन्ही संघ (Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders) या हंगामात चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरले आहेत, त्यामुळे या सामन्यात विजय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाईल. प्रेक्षक स्टारस्पोर्ट्स नेटवर्क आणि जिओहॉटस्टारच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) आपल्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर 44 धावांनी विजय मिळवला होता, मात्र त्यानंतरच्या दोन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. लखनऊ सुपर जायंट्सने 5 गडी राखून त्यांचा पराभव केला, तर दिल्ली कॅपिटल्सने 7 गडी राखून विजय मिळवला. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) आतापर्यंत 3 सामने खेळले असून, त्यांना पहिल्या सामन्यात बंगळुरूने 7 गडी राखून पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात त्यांनी राजस्थानविरुद्ध 8 गडी राखून विजय मिळवला, मात्र त्यानंतरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने त्यांचा 8 गडी राखून पराभव केला.
KKR चे नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार असून, SRH च्या कर्णधारपदाची जबाबदारी पॅट कमिन्सकडे आहे. हेड-टू-हेड आकडेवारी पाहता, KKR चा संघ SRH पेक्षा वरचढ ठरत आहे. IPL मध्ये दोन्ही संघ आतापर्यंत 28 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यात KKR ने 19 सामने जिंकले असून, SRH ने 9 विजय मिळवले आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders Team) संघ: अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंह, क्विंटन डी कॉक, रहमानुल्लाह गुरबाज, अंगकृष रघुवंशी, वेंकटेश अय्यर, रमनदीप सिंह, आंद्रे रसेल, एनरिक नॉर्किया, हर्षित राणा, सुनील नरायन, वरुण चक्रवर्ती, लवनिथ सिसौदिया, अनुकूल रॉय, मोइन अली, रोवमैन पॉवेल, मनीष पांडे, स्पेंसर जॉनसन, वैभव अरोड़ा आणि मयंक मारकंडे.
सनरायझर्स हैदराबाद संघ (Sunrisers Hyderabad Team) : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, ईशान किशन, हेनरिक क्लासेन, अभिषेक शर्मा, सचिन बेबी, मोहम्मद शमी, ॲडम झम्पा, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, राहुल चाहर, ईशान मलिंगा, हर्षल पटेल, कामिंडु मेंडिस, वियान मुल्डर, नितीश कुमार रेड्डी, अथर्व तायडे, ब्रायडन कार्से, सिमरजीत सिंह, जयदेव उनाडकट, जीशान अन्सारी.