CSK vs RCB, IPL 2025: आरसीबी चेपॉकच्या मैदानावर 17 वर्षांनी विजय मिळवणार की चेन्नई पुन्हा मारणार बाजी? कुठे पाहू शकता सामना? वाचा

CSK vs RCB, IPL 2025: आयपीएल 2025 मधील 8वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या संघात पार पडणार आहे. दोन्ही संघांनी या स्पर्धेतील त्यांचे पहिले सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजही विजय मिळवत विजयी घौडदोड कायम ठेवण्याचा प्रयत्न दोन्ही संघांकडून केला जाईल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्समधील हा सामना चेन्नईतील चेपॉकच्या स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. IPL मध्ये RCB ने चेपॉक येथे CSK विरोधात फक्त एकदाच 2008 मध्ये विजय मिळवला आहे.  विराट कोहली हा त्या विजयातील एकमेव सदस्य सध्या संघात आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बगंळुरूला 17 वर्षांचा चेपॉकच्या मैदानावरील पराभवाची वचपा काढण्याची आज संधी आहे. 

चेपॉक येथे फिरकीपटूंचा दबदबा नेहमीच पाहायला मिळाला आहे. मागील सामन्यात नूर अहमदने मुंबईविरुद्ध चार विकेट्स घेतल्या होत्या. तर, अश्विनने पुनरागमन करत आपली आपली छाप सोडली होती.

एम. चिदंबरम स्टेडियमच्या मैदानावर आयपीएलचे एकूण 78 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 46 सामने जिंकले आहेत, तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने 32 सामन्यांत विजय मिळवला आहे. दुसरीकडे, आयपीएलमध्ये CSK आणि RCB यांच्यात आतापर्यंत एकूण 33 सामने झाले आहेत, त्यापैकी 21 सामने चेन्नई सुपर किंग्जने जिंकले आहेत, तर RCB ने 11 सामन्यांत विजय प्राप्त केला आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे.

आजचा सामना कुठे पाहता येईल?

CSK आणि RCB यांच्यातील सामना सायंकाळी 7 वाजता स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि जिओहॉटस्टारवर पाहता येईल.

चेन्नई सुपर किंग्ज संघ: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डेव्हॉन कॉनव्हे, रचिन रवींद्र, विजय शंकर, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, एमएस धोनी (विकेटकीपर), सॅम करन, आर अश्विन, मथीशा पाथिराना, कमलेश नागरकोटी, नॅथन एलिस, मुकेश चौधरी, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, खलील अहमद, जेमी ओव्हरटन, शेख रशीद, अंशुल कंबोज, श्रेयस गोपाल, नूर अहमद, गुर्जपनीत सिंग, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्धार्थ सी आणि वंश बेदी.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ:   रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, जोश हेजलवूड, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, लियम लिव्हिंगस्टोन, रसीख सलाम, सुयश शर्मा, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्निल सिंग, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, नुवान तुषारा, मनोज बंडगे, जेकब बेथेल, देवदत्त पडिक्कल, स्वस्तिक छिकारा, लुंगी एन्गिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी.