IPL 2025 RCB vs GT | इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) 2025 मधील 14वा सामना आज (2 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात रंगणार आहे. हा सामना बंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक 7:00 वाजता होणार आहे.
सध्या RCB संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे, तर गुजरात टायटन्स चौथ्या स्थानी आहे. आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे नेतृत्व रजत पाटीदारकडे, तर गुजरात टायटन्सचे कर्णधारपद शुभमन गिलकडे असेल.
RCB vs GT: हेड-टू-हेड आकडेवारी
IPL च्या इतिहासात या दोन्ही संघांमध्ये (Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans) आतापर्यंत 5 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 3 सामन्यांमध्ये RCB ने विजय मिळवला आहे, तर GT ने 2 सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे, बंगळूरुच्या मैदानावर झालेल्या 2 सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 विजय मिळवला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात अटीतटीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
सामना कधी आणि कुठे पाहता येईल?
- स्थळ: एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूरु
- वेळ: सायंकाळी 7:30 वाजता (नाणेफेक 7:00 वाजता)
- थेट प्रक्षेपण: स्पोर्ट्स 18 / स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
- लाईव्ह स्ट्रीमिंग: Jio Cinema आणि Hotstar ॲपवर
RCB आणि GT यांचे संघ
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB)
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, जोश हेजलवुड, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, लियाम लिविंगस्टोन, रसिख सलाम, सुयश शर्मा, मनोज भंडागे, जैकब बेथेल, देवदत्त पडिक्कल, स्वस्तिक चिकारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंह, मोहित राठी, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्निल सिंह, टिम डेविड, रोमारियो शेफर्ड आणि नुवान तुषारा.
गुजरात टायटन्स (GT)
शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, राहुल तेवतिया, राशिद खान, साई किशोर, कैगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा, जयंत यादव, महिपाल लोमरोर, साई सुदर्शन, ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, वॉशिंगटन सुंदर, कुमार कुशाग्र, अरशद खान, गुरनूर बरार, निशांत सिंधु, करीम जनत, कुलवंत खेजरोलिया, अनुज रावत, गेराल्ड कोएट्जी, शेरफेन रदरफोर्ड आणि मानव सुथार.