IPL 2025 LSG vs MI | इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या सामन्यात आज लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) एकमेकांसमोर भिडणार आहेत. दोन्ही संघांसाठी हा त्यांच्या हंगामातील चौथा सामना आहे. आतापर्यंत प्रत्येक संघाने केवळ 1 सामना जिंकला आहे.
मुंबई इंडियन्सने मागील लढतीत कोलकाता नाईट रायडर्सचा सहज पराभव करत विजयाच्या मार्गावर पुनरागमन केले. दुसरीकडे, लखनऊला पंजाब किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
लखनऊ सुपर जायंट्स: गोलंदाजीवर चिंता, दिग्वेश राठी वर लक्ष
लखनऊच्या फलंदाजांमध्ये मिचेल मार्श आणि निकोलस पूरन सातत्याने चमकत आहेत. मात्र डेव्हिड मिलर अद्याप खास प्रभाव पाडू शकलेला नाही. गोलंदाजीत रवी बिश्नोई अपेक्षित कामगिरी करत नसल्याने संघ अडचणीत आहे. शार्दुल ठाकूरच्या कामगिरीला दुसऱ्या बाजूने साथ मिळालेली नाही. मात्र प्रत्येक सामन्यात विकेट घेणाऱ्या दिग्वेश राठीकडून अपेक्षा आहेत.
मुंबई इंडियन्स: हार्दिकची फॉर्म चिंतेचा विषय
मुंबईने सुरुवातीचे दोन सामने गमावले असले तरी कोलकाताविरुद्ध प्रभावी विजय मिळवला. रियान रिकल्टनच्या अर्धशतकासह बहुतेक फलंदाजांनी योगदान दिले आहे. मात्र कर्णधार हार्दिक पंड्याची फॉर्म अजूनही चिंता वाढवत आहे.फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये तो अपयशी ठरत आहे. विजयाची मालिका कायम ठेवण्यासाठी सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मालाही फॉर्ममध्ये यावे लागेल.
आजचा सामना सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल. हा सामना स्टार् स्पोर्ट्स नेटवर्क आणि जिओ हॉटस्टारवर पाहता येईळ.
Mumbai Indians vs Lucknow Super Giants : दोन्ही संघ
लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) : ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), अब्दुल समद, आकाश दीप, आकाश सिंह, अवेश खान, आयुष बदोनी, मॅथ्यू ब्रीट्झके, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, हिम्मत सिंह, शमर जोसेफ, आर्यन जुयाल, अर्शिन कुलकर्णी, एडन मार्करम, मिशेल मार्श, डेव्हिड मिलर, निकोलस पूरन, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी, रवी बिश्नोई, शाहबाज अहमद, मणिमारन सिद्धार्थ, शार्दुल ठाकूर, मयंक यादव.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians Team) : हार्दिक पंड्या (कर्णधार), अश्वनी कुमार, राज बावा, कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, दीपक चहर, विल जॅक्स, बेवॉन जॅकोब्स, रॉबिन मिंज, मुजीब उर रहमान, नमन धीर, विग्नेश पुथुर, सत्यनारायण राजू, रियान रिकेल्टन, मिशेल सेंटनर, कर्ण शर्मा, रोहित शर्मा, कृष्णन श्रीजीत, अर्जुन तेंडुलकर, तिलक वर्मा, रीस टोपले, सूर्यकुमार यादव.