Gujarat Titans Vs Mumbai Indians : आयपीएल 2025 (IPL 2025) स्पर्धेत आज गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात सामना पार पडणार आहे. या हंगामात गुजरातने आपला पहिला सामना पंजाब किंग्सविरुद्ध खेळला होता या सामन्यात त्यांना 11 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
तर, मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 4 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत, दोन्ही संघ हा सामना जिंकून या हंगामातील आपल्या पहिल्या विजयाची नोंद करण्याचा प्रयत्न करतील.
आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये झालेल्या पाच सामन्यांपैकी गुजरात टायटन्सने 3 सामने जिंकले आहेत, तर मुंबई इंडियन्सने 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
हार्दिक पांड्या आजच्या सामन्यात मैदानावर उतरणार आहे. बॅनमुळे पहिल्या सामना त्याला खेळता आला नव्हता. हार्दिक पांड्या परतल्याने मुंबई इंडियन्सच्या संघात संतुलन प्राप्त होईल. याशिवाय, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्या फॉर्मकडे देखील सर्वांचे लक्ष असेल.गुजरातच्या संघाचे यश देखील शुभमन गिल, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि जोस बटलर या खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून असेल.
GT vs MI सामना कुठे खेळला जाईल?
गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील सामना 29 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
GT vs MI सामना कधी सुरू होईल?
गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील सामना 2 सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्याचा टॉस सायंकाळी 7:00 वाजता होईल. हा सामना जिओहॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येईल.
गुजरात टायटन्सचा संभाव्य संघ: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), शेरफेन रदरफोर्ड, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, साई किशोर, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
मुंबई इंडियन्स संभाव्य संघ: रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिशेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू.