IPL 2025 | आयपीएलच्या 18 व्या हंगामात आज (30 मार्च) क्रिकेट रसिकांसाठी डबल हेडरचा थरार असणार आहे. दिवसाच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आमनेसामने येतील. हा सामना दुपारी 3:30 वाजता विशाखापट्टणम येथे खेळला जाईल. दिल्लीचे नेतृत्व अक्षर पटेल, तर हैदराबादचे नेतृत्व पॅट कमिन्स करणार आहे. दोन्ही संघांकडे तगडे फलंदाज असल्याने गोलंदाजांची कसोटी लागणार आहे.
पहिल्या सामन्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजता राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात दुसरा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना असेल. चेन्नईने आपल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला हरवून विजयी सुरुवात केली, मात्र दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने आपले दोन्ही सामने गमावले आहेत. त्यामुळे चेन्नईविरुद्ध विजय मिळवून पराभवाची हॅटट्रिक टाळण्याचे मोठे आव्हान राजस्थानसमोर असेल. या सामन्याचा टॉस संध्याकाळी 7 वाजता होईल.
दोन्ही सामने कुठे पाहता येतील?
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (DC vs SRH) आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (RR vs CSK) हे सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि जिओहॉटस्टार वर पाहता येतील.
संभाव्य संघ
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)
दिल्ली कॅपिटल्स: जेक फ्रेजर मॅकगर्क, फाफ डु प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार.
सनरायझर्स हैदराबाद: अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद शमी.
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings)
चेन्नई सुपर किंग्स: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डेव्हॉन कॉनव्हे, रचिन रवींद्र, विजय शंकर, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, एमएस धोनी (विकेटकीपर), सॅम करन, आर अश्विन, मथीशा पाथिराना, कमलेश नागरकोटी, नॅथन एलिस, मुकेश चौधरी, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, खलील अहमद, जेमी ओव्हरटन, शेख रशीद, अंशुल कंबोज, श्रेयस गोपाल, नूर अहमद, गुर्जपनीत सिंग, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्धार्थ सी आणि वंश बेदी.
राजस्थान रॉयल्स: रियान पराग (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शुभम दुबे, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, फजलहक फारुकी, कुमार कार्तिकेय, आकाश मढवाल, युद्धवीर सिंह चरक, महीश तीक्षाना, क्वेना मफाका, अशोक शर्मा, वैभव सूर्यवंशी आणि कुणाल सिंग राठौर.