स्मार्टफोन ब्रँड इनफिनिक्सने भारतात आपल्या लोकप्रिय Note-Series अंतर्गत नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने Infinix Note 50X 5G या डिव्हाइसला लाँच केले असून, यात पॉवरफुल मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 Ultimate चिपसेट, अँड्रॉइड 15 सपोर्ट, 5500mAh बॅटरी आणि 50MP मुख्य कॅमेरा यासारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. फोनची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया.
Infinix Note 50X 5G चे फीचर्स
Infinix च्या या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा HD+ डिस्प्ले असून, त्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यात ऑक्टा-कोर 4nm MediaTek Dimensity 7300 Ultimate चिपसेट देण्यात आला आहे. हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे, जो या चिपसेटसह सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये 6GB आणि 8GB रॅम वेरिएंटसोबत 128GB स्टोरेज मिळते. MemFusion Technology च्या मदतीने 6GB रॅम वेरिएंटला 12GB पर्यंत आणि 8GB रॅम वेरिएंटला 16GB पर्यंत वाढवता येते.
Infinix Note 50X 5G स्मार्टफोन ड्युअल सिम सपोर्ट करतो आणि हा अँड्रॉइड 15 आधारित XOS 15 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. पॉवरसाठी यात 5500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच, या बॅटरीला 10W वायर्ड रिव्हर्स चार्जिंग आणि बायपास चार्जिंगचा सपोर्ट देखील मिळतो.
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस ड्युअल-कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूस Active Halo Lighting फीचर देण्यात आले आहे, जी नोटिफिकेशन, कॉल आणि चार्जिंग दरम्यान चालू होते. या स्मार्टफोनमध्ये अनेक AI-आधारित फिचर्स देण्यात आले आहेत.
Infinix Note 50X 5G ची किंमत
Infinix Note 50X 5G स्मार्टफोन दोन स्टोरेज वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 11,499 रुपये आहे, तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन पर्पल, ग्रीन आणि ग्रे या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
ग्राहकांना फोनवर 1000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळू शकतो, त्यामुळे Note 50X 5G चा बेस वेरिएंट 10,499 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. या स्मार्टफोनची विक्री 3 एप्रिलपासून फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे.