92 वर्षांत पहिल्यांदाच IMA मध्ये महिलांना मिळणार प्रशिक्षण, NDA मधील पहिली तुकडी लवकरच होणार पदवीधर

Indian Military Academy | 92 वर्षांत पहिल्यांदाच देहरादून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमी (IMA) मध्ये महिला अधिकाऱ्यांना (women officer cadets) प्रशिक्षण दिले जाणार आहे. जुलै 2025 मध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) खडकवासला येथून महिला अधिकाऱ्यांची पहिला तुकडी पदवीधर होणार आहे. 3 वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महिला एनडीएची परीक्षा देऊ शकतात, असा ऐतिहासिक निर्णय दिला होता. त्यानंतर आता एनडीएमधून महिला अधिकाऱ्यांची पहिली तुकडी बाहेर पडणार आहे.

त्यानंतर त्यांना तिन्ही संरक्षण दलांच्या वेगवेगळ्या प्रशिक्षणांसाठी विविध संस्थांमध्ये पाठवले जाईल. IMA (Indian Military Academy) ने देखील आता महिला अधिकाऱ्यांसाठी आपले दरवाजे उघडले आहेत आणि त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

रिपोर्टनुसार, NDA मध्ये अंतिम टप्प्यात प्रशिक्षण घेत असलेल्या एकूण 18 महिलांपैकी 8 महिलांनी सैन्यदलाचा (Military) पर्याय म्हणून निवड केली आहे. या महिला अधिकाऱ्यांना IMA मध्ये एक वर्षांचे प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यानंतर त्या अधिकारी म्हणून नियुक्त होतील. 

दरम्यान, ऑगस्ट 2021 मध्येच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता की महिलाही एनडीए परीक्षेच्या माध्यमातून सैन्यात अधिकारी होऊ शकतात. या निर्णयाचे अनेकांना स्वागत केले होते. आता याच माध्यमातून मोठ्या प्रमाणात महिला सैन्यात भरती होत आहेत.

ऑगस्ट 2022 मध्ये या महिला NDA (National Defence Academy) मध्ये दाखल झाल्या होत्या. महिला अधिकाऱ्यांची पहिला तुकडी मे महिन्यात NDA मधून उत्तीर्ण होईल. सध्या एनडीएमध्ये 126 प्रशिक्षणार्थी महिला आहेत, ज्या वेगवेगळ्या स्तरावर प्रशिक्षण घेत आहे. 

देहरादून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमी 92 वर्षात पहिल्यांदाच महिला कॅडेट्सला प्रशिक्षण देणार आहे. सध्या ही देशातील एकमेव लष्करी अकादमी आहे जेथे महिलांना प्रशिक्षण दिले जात नाही.