भारतीय अर्थव्यवस्थेची दमदार वाटचाल; 2026 मध्ये 6.7% वाढीचा अंदाज

India GDP 2026 Prediction | 2026 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था (Indian economy growth) 6.7 टक्क्यांच्या दराने वाढू शकते, असा अंदाज लावण्यात आला आहे. लाइट हाऊस कॅन्टोनच्या (Light House Canton) अहवालात ही माहिती देण्यात आली. या वाढीमागे चक्रीय सुधारणा आणि शेअर बाजारातील चांगली कामगिरी हे मुख्य घटक असतील, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

गेल्या 5 वर्षांत उत्पन्नात लक्षणीय वाढ

अहवालानुसार, मागील 5 वर्षांत देशात उत्पन्नाच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असून, निफ्टी निर्देशांकाने 20 टक्के चक्रवाढ वार्षिक वाढ दर (CAGR) गाठला आहे. पुढील विकासासाठी सरकारी भांडवली खर्च, मध्यमवर्गाला दिली जाणारी करसवलत आणि ग्राहकांची वाढती मागणी (India Investment Based Expansion) हे घटक महत्त्वाचे ठरणार आहेत.

2025 मध्ये उत्पन्नवाढीची शक्यता

2025 मध्ये उत्पन्नवाढ आणि बाजाराला बळकटी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. गुंतवणुकीवर आधारित वाढ आणि सरकारची वित्तीय शिस्त यामुळे खासगी गुंतवणुकीला चालना मिळू शकते, असा आशावाद व्यक्त केला आहे.

रेपो दर कपातीतून वाढीस मदत

भारतीय रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी 2025 मध्ये 25 आधार अंकांनी रेपो दर (RBI repo rate cut impact) कपात केली. 5 वर्षांतील ही पहिलीच कपात असून त्यामुळे आर्थिक गती वाढण्यास मदत होईल, असे विश्लेषण करण्यात आले आहे.

सोन्याला जागतिक अस्थैर्याच्या काळात पसंती

अमेरिकन डॉलरची हालचाल आणि जागतिक व्यापारातली तेजी गुंतवणूक बाजारावर प्रभाव टाकत आहे. अशा अस्थिरतेच्या काळात सोन्याला (Gold investment trends) सुरक्षित पर्याय म्हणून पसंती मिळत आहे. याशिवाय, कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहण्याची शक्यता व्यक्त झाली असून, त्यामुळे भारतासारख्या आयातावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेला फायदा होऊ शकतो.

2025 मध्ये गुंतवणूकदार दीर्घकालीन संधी आणि शिस्तबद्ध गुंतवणूक धोरणांकडे झुकतील, असे या अहवालात म्हटले आहे.