भारतीय सैन्यात जाण्याची सुवर्णसंधी! अग्निवीर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी, पाहा माहिती

Indian Army Agniveer Bharti 2025 | भारतीय सैन्यात भरती होण्याची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अग्निवीर भरती 2025 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू असून, अर्ज भरण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल 2025 आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा, असे आवाहन भारतीय सैन्याकडून करण्यात आले आहे.

भरती प्रक्रियेचा तपशील

भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर जाऊन उमेदवारांना अर्ज भरावा लागेल. या भरतीमध्ये अग्निवीर (जनरल ड्यूटी), टेक्निकल, क्लर्क, स्टोअर कीपर टेक्निकल, ट्रेड्समन, सैनिक फार्मा, सैनिक तंत्रज्ञान नर्सिंग सहायक आणि महिला सैन्य पोलिस पदांसाठी भरती केली जाणार आहे.

याशिवाय, हवालदार (सर्वेअर आणि एज्युकेशन), जेसीओ (धार्मिक शिक्षक आणि कॅटरिंग) आणि ऑटोमेटेड कार्टोग्राफर यांसारख्या पदांसाठी देखील अर्ज मागविण्यात आले आहेत.

यावर्षीच्या भरती प्रक्रियेत एकाच वेळी दोन पदांसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. तसेच, अर्जासाठी 250 रुपये शुल्क लागणार आहे.

पात्रता आणि वयोमर्यादा – वय: 17 ते 21 वर्षे

शैक्षणिक पात्रता:

  • जनरल ड्यूटी पद: किमान 10वी उत्तीर्ण
  • ट्रेड्समन पद: किमान 8वी उत्तीर्ण
  • इतर पदे: संबंधित क्षेत्रातील शैक्षणिक पात्रता आवश्यक

शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी

उमेदवारांना 1.6 किमी धावणे, पुलअप्स आणि इतर शारीरिक चाचण्या द्याव्या लागतील. तसेच, पुरुष आणि महिला उमेदवार अविवाहित असणे आवश्यक आहे. मात्र, विधवा आणि कायदेशीररित्या घटस्फोटित महिला काही अटींनुसार अर्ज करू शकतात.

अग्निवीर भरती परीक्षा आणि सुविधा
प्रवेश परीक्षा:
जून 2025 मध्ये आयोजित होण्याची शक्यता

भाषा: परीक्षा 13 भाषांमध्ये होईल, त्यात हिंदी, इंग्रजी, मराठी आणि इतर प्रादेशिक भाषा समाविष्ट असतील.

अर्ज करण्याची अंतिम संधी

अग्निवीर भरतीसाठी इच्छुक तरुणांनी अंतिम तारखेच्या प्रतीक्षेत न राहता 10 एप्रिल 2025 पूर्वी अर्ज दाखल करावा.