निधी तिवारी कोण आहेत? पंतप्रधान मोदींच्या नव्या खाजगी सचिवांविषयी जाणून घ्या

Nidhi Tewari named private secretary to PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नवीन खाजगी सचिवपदी (PM Modi’s private secretary) भारतीय विदेश सेवेतील (IFS) अधिकारी निधी तिवारी (Nidhi Tewari) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने या प्रस्तावास मंजुरी दिली असून, कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DoPT) याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

निधी तिवारी सध्या पंतप्रधान कार्यालयात (PMO) उपसचिव पदावर कार्यरत आहेत. त्यांची ही नवीन जबाबदारी वेतन मॅट्रिक्सच्या स्तर 12 नुसार असेल आणि ती त्यांच्या सध्याच्या पदासोबत किंवा पुढील आदेश येईपर्यंत कायम राहील.

29 मार्च रोजी जारी आदेशानुसार, तिवारी लवकरच आपल्या सध्याच्या जबाबदारीतून मुक्त होऊन नवीन कार्यभार स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ सध्याच्या प्रशासनाच्या कार्यकाळाच्या समाप्तीपर्यंत किंवा पुढील निर्देश मिळेपर्यंत असेल.

कोण आहेत निधी तिवारी? (Who is Nidhi Tewari)

2014 बॅचच्या IFS अधिकारी निधी तिवारी या वाराणसीच्या महमूरगंज भागातील रहिवासी आहेत. विशेष म्हणजे, वाराणसी हा 2014 पासून पंतप्रधान मोदींचा लोकसभा मतदारसंघ आहे. नागरी सेवा परीक्षेत त्यांनी 2013 मध्ये 96 वा क्रमांक मिळवत भारतीय विदेश सेवेत प्रवेश केला होता. यापूर्वी त्यांनी वाराणसीमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणूनही काम केले आहे.

6 जानेवारी 2023 पासून त्या PMO मध्ये उपसचिव पदावर कार्यरत आहेत. याआधी 2022 मध्ये त्यांनी अंडर सेकेटरी म्हणून पीएमओमध्ये योगदान दिले होते.

PMO मध्ये नियुक्ती होण्यापूर्वी तिवारी यांनी परराष्ट्र मंत्रालयातील निरस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहार विभागात काम केले आहे. परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा फायदा PMO मध्ये मोठ्या प्रमाणावर झाला आहे. विशेषतः ‘परराष्ट्र आणि सुरक्षा’ विभागात त्या थेट राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना रिपोर्टिंग करत असे.