ChatGPT मधून घिबली स्टाईल AI इमेजेस आणि व्हिडिओ कसे बनवायचे?

Ghibli-style images | गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) द्वारे तयार केलेल्या स्टुडिओ घिबली स्टाइल इमेजेसची (Ghibli-style images) जोरदार चर्चा आहे. OpenAI ने GPT-4o साठी नवीन इमेज जनरेशन फीचर आणल्यामुळे हे शक्य झाले आहे, ज्यामुळे अधिक अचूक आणि सुसंगत इमेजेस तयार करता येतात. 

OpenAI चे टेक्स्ट-टू-व्हिडिओ जनरेटर Sora सध्या कंपनीच्या पेड मेंबर्सद्वारे घिबली स्टाईलचे AI व्हिडिओ बनवण्यासाठी वापरले जात असले, तरी काही युजर्सनी ChatGPT वापरून मोफत अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवण्याचा एक सोपा मार्ग शोधला आहे.  

मोफत घिबली स्टाईल AI व्हिडिओ कसे बनवायचे?  

सध्या Sora चा ॲक्सेस फक्त ChatGPT च्या पेड युजर्ससाठी मर्यादित असल्याने, एका Reddit युजरने लोकप्रिय जपानी ॲनिमेमधील एक इमेज वापरून आणि ChatGPT च्या इमेज जनरेशन आणि एन्कोडिंग क्षमतेचा वापर करून घिबली स्टाईलचा AI व्हिडिओ बनवण्याची युक्ती शोधली आहे. 

यासाठी युजरला ChatGPT ला एका फोल्ड केलेल्या नोटबुक पेपरची इमेज देऊन, फ्रेम-बाय-फ्रेम अशा 10 इमेजेस तयार करण्यास सांगायचे आहे. त्यानंतर Python वापरून त्या इमेजेस क्रमाने एकत्र करून 5 FPS चा MP4 व्हिडिओ तयार करता येतो. u/TheKlingKong या Reddit युजरने ChatGPT द्वारे तयार केलेला व्हिडिओ पोस्ट देखील केला आहे.  

OpenAI ने सध्या पेड आणि फ्री युजर्स दोघांसाठीही ChatGPT च्या इमेज जनरेशन क्षमतेवर मर्यादा घातली आहे.

ChatGPT वापरून घिबली स्टाईल इमेजेस (Ghibli-style images) कशा बनवायच्या?  

1. OpenAI ChatGPT वेबसाइट किंवा ॲप उघडा  

2. तुमची आवडती इमेज अपलोड करा किंवा ChatGPT ला आवश्यक माहिती देऊन एक नवीन इमेज जनरेट करा  

3. चॅटबॉटला फक्त ‘Ghiblify’ इमेज किंवा ‘Turn this image in the theme of Studio Ghibli style’ असे सांगा  

4. काही सेकंदात तुम्हाला अपेक्षित इमेज मिळेल  

तुम्ही जर 20 डॉलर प्रति महिना खर्च करू शकत असाल, तर OpenAI Sora ला देखील हेच इमेज जनरेशन अपडेट मिळाले आहे, ज्याचा वापर करून 1080p रिझोल्यूशन चे 20 सेकंदांपर्यंतचे घिबली स्टाईल व्हिडिओ वाइडस्क्रीन, व्हर्टिकल किंवा स्क्वेअर अस्पेक्ट रेश्यो मध्ये तयार करता येतात.