Honda India भारतीय बाजारात नवनवीन दुचाकी लाँच करत आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच 2025 होंडा शाइन 125 ला बाजारात सादर केले होते. त्यानंतर आता कंपनीकडून नवीन NX200 ला लाँच करण्यात आले आहे.
NX200 हे CB200X ते रीब्रँडेड मॉडेल आहे. नवीन Honda NX200 ची किंमत 1.68 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. या नवीन मॉडेलसह Honda आता भारतात NX रेंजमधील NX200 आणि NX500 या दोन बाइक्सची विक्री करत आहे.
Honda NX200 ला कंपनीने तीन आकर्षक रंगात सादर केले आहे. ग्राहक बाइकला अॅथलेटिक ब्लू मेटॅलिक, रेडियंट रेड मेटॅलिक आणि पर्ल इग्नियस ब्लॅक या रंगात खरेदी करू शकतात. हे रंग बाइकला दमदार आणि स्टायलिश लुक देतात.
इंजिनबद्दल सांगायचे तर NX200 मध्ये OBD-2B कंप्लायंट 184.4cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 17PS पॉवर आणि 15Nm टॉर्क निर्माण करते. हे 5-स्पीड गिअरबॉक्स सह येते, यामध्ये स्लिप-अँड-असिस्ट क्लच दिला आहे.
NX200 मध्ये गोल्डन-कलर इनव्हर्टेड फ्रंट फोर्क आणि रिअर मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आले आहे. ही बाईक 17-इंच अलॉय व्हील्स*वर धावते, ज्यामध्ये 110-सेक्शन फ्रंट आणि 140-सेक्शन रिअर ट्यूबलेस टायर्सदेण्यात आले आहेत. ऑफ-रोड राइडिंगसाठी ही बाइक सर्वोत्तम आहे.
याशिवाय, NX200 मध्ये ऑल-एलईडी लाईटिंग सेटअप देण्यात आला असून, यामध्ये एलईडी इंडिकेटर्स आणि खास X-शेप टेल लॅम्पचा समावेश आहे. तसेच, या बाईकमध्ये 4.2-इंच TFT डिस्प्ले देण्यात आला आहे, जो आधुनिक लुकसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी** प्रदान करतो. या डिस्प्लेमध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल आणि एसएमएस अलर्ट्स यांसारख्या स्मार्ट फीचर्स मिळतात. सोबतच, USB Type-C चार्जिंग पोर्ट देखील देण्यात आला आहे.