HMPV: चीनमध्ये पसरलेला ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस किती धोकादायक? कोणाला होऊ शकते याची लागण?

Human metapneumovirus: चीनमध्ये (China) वैगाने पसरलेल्या ह्युमन मेटापन्यूमोव्हायरसमुळे पुन्हा एकदा जगाच्या चिंता वाढवल्या आहेत. 5 वर्षापूर्वी चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला होता. आता पुन्हा एकदा नवीन व्हायरसचा प्रसार वेगाने होत असल्याने सर्वांच्या चिंता वाढल्या आहेत. भारतातही आरोग्य मंत्रालयांतर्गत असलेल्या एनसीडीसीद्वारे यावर लक्ष ठेवले जात आहे?

ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (Human metapneumovirus) किती धोकादायक?

चीनमध्ये या व्हायरसने (HMPV) थैमान घातले आहे. चीननमध्ये या व्हायरसची किती जणांना लागण झालेली आहे. याचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. परंतु, जपानमध्येही या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. चीनमध्ये आतापर्यंत 7 लाखांपेक्षा अधिक रुग्णांना याची लागण झाली आहे.

कोरोना व्हायरसचा वेगाने प्रसार होत होता. त्या तुलनेत या व्हायरसच्या प्रसाराचा वेग कमी आहे. चीनमध्ये वातावरणातील बदलामुळे, प्रामुख्याने हिवाळ्यात इन्फ्लूएंझा, रायनोव्हायरस, रेस्पिरेटरी सिंकिटल व्हायरस (आरएसव्ही) आणि ह्युमन मेटान्यूमोव्हायरसची (HMPV) लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV outbreak in China) हा जुनाच व्हायरस आहे. चीनने देखील यावर स्पष्टीकरण दिले आहे की, हिवाळ्यात श्वसनासंबंधी आजारात दरवर्षी वाढ होते. मागील वर्षीच्या तुलनेत या आजाराच्या रुग्णांची संख्या कमी आहे व प्रसार देखील कमी असल्याचे चीनने म्हटले आहे.

ह्युमन मेटापन्यूमोव्हायरसचा (Human metapneumovirus) कोणाला सर्वाधिक धोका?

HMPV ची लागण सर्ववयोगटातील लोकांना होऊ शकते. प्रामुख्याने हिवाळ्यात या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढते. लहान मुलं, वृद्ध नागरिक आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्यांना या आजाराची लागण होण्याची शक्यता अधिक असते.

भारतातही सतर्क

चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमोव्हायरसची (HMPV in China) लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्याने भारतही सतर्क झाला आहे. भारतातही आरोग्य मंत्रालयांतर्गत असलेल्या एनसीडीसीद्वारे यावर लक्ष ठेवले जात आहे. श्वसन आणि इन्फ्लूएंझाशी संदर्भातील रुग्णांच्या आकडेवारीवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच, सध्याच्या स्थितीमध्ये घाबरण्याचे कोणतेही नाही.