Hero Xtreme 250R Launch Soon: हिरो मोटोकॉर्प लवकरच भारतीय बाजारात पाच नवीन प्रीमियम बाइक्स मॉडेलला लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी 2025 मध्ये होणाऱ्या भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये अनेक नवीन मॉडेल्स सादर करू शकते. यातील काही मॉडेल्स नंतर भारतीय दुचाकी बाजारात लाँच होऊ शकतात. कंपनी लवकरच Xtreme 250R बाइकला भारतीय बाजारात लाँच करण्याची शक्यता आहे.
Hero Xtreme 250R बाइकला याआधी EICMA मध्ये सादर करण्यात आले होते. कंपनीकडून लाँच केली जाणारी वर्ष 2025 मधील ही पहिली बाइक असेल. ही बाइक लाँचिंगनंतर KTM 250 Duke ला टक्कर देईल. लाँचिंग गाडीचे डिझाइन समोर आले आहे.
गाडीच्या डिझाइनबद्दल सांगायचे तर हिरो एक्स्ट्रीम 250R मध्ये हटके डिझाइनसह येणारी एलईडी हेडलाइट आणि फ्युल टँक देण्यात आले आहे. यामुळे बाइकला अॅग्रेसिव्ह स्ट्रीट-फाइटर लूक प्राप्त होतो. कंपनीने टँक एक्सटेंशन्स देखील जोडले आहे. याशिवाय, बाइकचे साइड पॅनेल आणि टेल सेक्शन एकाच यूनिटमध्ये जोडण्यात आले आहे. यावर ग्राफिक्स आणि 3 वेगवेगळे रंग देण्यात आले आहेत, जे डिझाइनला अधिकच आकर्षक बनवते.
ब्रेकिंगसाठी डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहे. तसेच, अतिरिक्त सुरक्षिततेसाठी ब्रँड स्विचेबल ABS मिळेल. Hero Xtreme 250R बाइक 17 इंच व्हील्ससह येते. याशिवाय, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील देण्यात असून, याद्वारे विविध फीचर्सचा वापर करता येईल. Hero Xtreme 250R बाइकमध्ये 250 सीसी सिंगल-सिलिंडर लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले असून, हे 9,250 rpm वर 30 bhp आणि 7,250 rpm वर 25 Nm टॉर्क जनरेट करते. हे 6-स्पीड गिअरबॉक्ससह येते.