Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar | केंद्र सरकारद्वारे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलांना राष्ट्रीय बाल पुरस्काराद्वारे (Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar 2025) सन्मानित केले जाते. यावर्षीसाठीची या पुरस्कारची अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
महिला आणि बालविकास मंत्रालयाने (Ministry of Women and Child Development) ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’ साठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. 1 एप्रिल 2025 पासून यासंंबंधित अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. पात्र उमेदवार राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल https://awards.gov.in वर जाऊन आपला अर्ज सादर करू शकतात. या पुरस्कारासाठी स्वत: अर्ज सादर करणे (सेल्फ-नॉमिनेशन) किंवा शिफारसीद्वारे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 आहे.
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar 2025) हा एक प्रतिष्ठित राष्ट्रीय सन्मान आहे. शौर्य, क्रीडा, सामाजिक सेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण तसेच कला आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये अपवादात्मक कामगिरी करणाऱ्या मुलांना प्रदान केला जातो.
भारतात राहणारे 5 ते 18 वयोगटातील (31 जुलै 2025 पर्यंत वय गणले जाईल) भारतीय नागरिक ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’ साठी (Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar 2025) पात्र ठरतील.
महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे दरवर्षी या पुरस्काराचे आयोजन केले जाते. या उपक्रमाचा उद्देश देशातील युवा प्रतिभांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेणे हा आहे.