युवांनो लक्ष द्या! सरकारी नोकरीची मोठी संधी, देशभरात 10 हजारांहून अधिक पदांसाठी भरती

Government Job Recruitment | सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. देशभरातील विविध सरकारी विभागांमध्ये तब्बल 10,591 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. काही पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे, तर काही भरती प्रक्रियांसाठी अर्ज लवकरच सुरू होणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी वेळ न गमावता अर्ज करण्याची तयारी ठेवावी.  

RRB ALP भरती 2025 (RRB ALP Recruitment 2025) : 9,970 सहाय्यक लोको पायलट पदांसाठी मोठी संधी  

रेल्वे भरती मंडळ (RRB) सहाय्यक लोको पायलट (ALP) पदांसाठी मेगाभरती करणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 10 एप्रिल 2025 पासून सुरू होणार असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 9 मे 2025 आहे. RRB च्या अधिकृत वेबसाइटवर लवकरच या भरतीबाबत संपूर्ण माहिती उपलब्ध होईल.   

CSIR CRRI भरती 2025: 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी  

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेने (CRRI) 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये कनिष्ठ सचिवालय सहाय्यक आणि कनिष्ठ स्टेनोग्राफरच्या एकूण 209 पदांवर भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार 21 एप्रिल 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 22 मार्च पासून सुरू झाली आहे.  

NGEL भरती 2025 (NGEL Recruitment 2025): NTPC ग्रीन एनर्जीमध्ये इंजिनियर आणि कार्यकारी पदांसाठी संधी  

NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड (NGEL) ने इंजिनियर आणि कार्यकारी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार ngel.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन 1 मे 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 11 एप्रिल 2025 पासून सुरू होणार आहे. या भरतीअंतर्गत 182 पदांवर निवड केली जाणार आहे.

NHSRCL भरती 2025 (NHSRCL Recruitment 2025): व्यवस्थापक पदांसाठी अर्ज सुरू  

नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) कडून व्यवस्थापक पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवार 24 एप्रिल 2025 पर्यंत अधिकृत वेबसाइट nhsrcl.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे 72 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.  

पंजाब आणि सिंध बँक अप्रेंटिस भरती 2025: बँकेत नोकरीसाठी संधी  

बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. पंजाब आणि सिंध बँकेने अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया 24 मार्च 2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 मार्च 2025 आहे. इच्छुक उमेदवार punjabandsindbank.co.in किंवा nats.education.gov.in या वेबसाइट्सवर जाऊन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे 158 पदांवर भरती केली जाणार आहे.  

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांनी संबंधित भरतीच्या अधिकृत वेबसाइट्सवर जाऊन सविस्तर माहिती घेऊन अर्ज करण्याची संधी दवडू नये.