Crocodile spotted on IIT-Bombay Powai Campus | आयआयटी बॉम्बेच्या (IIT Bombay) कॅम्पसमध्ये एक भलीमोठी मगर (Crocodile IIT-Bombay Campus) मुक्तपणे फिरताना आढळल्याने एकच खळबळ उडल्याचे पाहायला मिळाले. अचानक रस्त्यावर मगर दिसल्याने नागरिक देखील आश्चर्यचकित झाले. ही घटना दोन दिवसांपूर्वीचे असल्याचे सांगितले जात असून, याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही मगरी जवळच्या पवई तलावातून (Powai Lake) कॅम्पसमध्ये आली असल्याचे सांगितले जात आहे. आयआयटी बॉम्बेचा हा परिसर पवई तलावाला लागूनच असल्याने आता मगरी देखील या भागात दिसू लागल्या आहेत.
मगरीला प्रथम कॅम्पसमधील एका रस्त्यावर पाहण्यात आले. तिथे उपस्थित विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी त्वरित वन विभागाला माहिती दिली. IITच्या सुरक्षा रक्षकांनी त्वरित खबरदारी घेतली, ज्यामुळे कोणाला इजा झाली नाही. काहीवेळाने मगर स्वतःच पुन्हा तलावात गेली.
🚨 Crocodile spotted in IIT Mumbai, Powai Lake, yesterday night. pic.twitter.com/hN6ei5plyV
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) March 24, 2025
तज्ञांनुसार, मॉन्सून दरम्यान पाण्याची पातळी वाढल्यामुळे मगर अनेकदा आपल्या नैसर्गिक अधिवासाबाहेर येतात. ही अशीच घटना असण्याची शक्यता आहे. या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
दरम्यान, पवई तलावात मोठ्या प्रमाणात मगरी आहेत. आयआयटी बॉम्बेचा परिसर याच्यालगतच असल्याने या भागात मगरी आढळून येत आहेत.