Elon Musk sells X to xAI | अब्जाधीश एलॉन मस्क (Elon Musk) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (माजी ट्विटर) आपल्या AI (Artificial Intelligence) कंपनी ‘xAI’ ला 33 अब्ज डॉलर्समध्ये विकण्याची घोषणा केली आहे. हा व्यवहार पूर्णपणे शेअर्सच्या स्वरूपात पार पडला आहे.
मस्क यांनी ‘X’ वर पोस्ट करत सांगितले की, “xAI च्या अत्याधुनिक AI क्षमतांचा आणि ‘X’ च्या मोठ्या यूजर बेसचा एकत्रित फायदा घेत, ही संधी मोठ्या प्रमाणावर विस्तार होण्यास मदत करेल.”
‘X’ विक्रीवर एलॉन मस्क यांचे स्पष्टीकरण (Elon Musk sells X to xAI)
मस्क यांच्या मते, ‘X’ आणि ‘xAI’ यांचे भविष्यातील कार्य एकमेकांशी जोडलेले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “आम्ही डेटा, मॉडेल्स, कॉम्प्युटेशन, डिस्ट्रीब्यूशन आणि प्रतिभा (टॅलेंट) एकत्र आणत आहोत. या निर्णयामुळे xAI ची आधुनिक AI क्षमता आणि ‘X’ चा प्रचंड यूजर बेस यामुळे एक नवा बदल घडणार आहे.”
या करारात xAI ची किंमत 80 अब्ज डॉलर्स आणि ‘X’ ची 33 अब्ज डॉलर्स असल्याचे मस्क यांनी सांगितले. या विलिनीकरणामुळे अब्जावधी लोकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साहाय्याने एक अधिक स्मार्ट आणि अर्थपूर्ण अनुभव मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
‘xAI’ म्हणजे काय आणि त्याचे उद्दिष्ट काय आहे?
‘xAI’ ही एलॉन मस्क यांची AI कंपनी आहे, जी मार्च 2023 मध्ये स्थापन करण्यात आली. “विश्वाचे खरे स्वरूप समजून घेणे” हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये तिचे मुख्यालय आहे.
ही कंपनी OpenAI ला पर्याय म्हणून उभी करण्यात आली असून, यामध्ये AI क्षेत्रातील तज्ज्ञ कार्यरत आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये ‘xAI’ चा पहिला प्रोजेक्ट ‘Grok’ जाहीर करण्यात आला, जो नंतर ‘X’ मध्ये एक AI फीचर म्हणून समाविष्ट करण्यात आला.
‘xAI’ चा मालक कोण आहे?
एलॉन मस्क हे ‘xAI’ चे संस्थापक आणि मुख्य मालक आहेत. ‘X’ आणि ‘xAI’ या दोन्ही खाजगी कंपन्या असल्याने इतर भागीदारांची माहिती अद्याप उघड झालेली नाही.