CUET PG परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू, जाणून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया

CUET PG 2025 registration Process : पदव्युत्तर शिक्षणासाठी अ‍ॅडमिशन घेण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजेन्सीद्वारे (NTA) सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा (CUET PG) आयोजित केली जाते. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये अ‍ॅडमिशन घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे. यासंदर्भातील नॉटिफिकेशन एनटीएद्वारे जारी करण्यात आले आहे. CUET PG 2025 साठीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, परीक्षा मार्च 2025 मध्ये आयोजित केली जाणार आहे.

CUET PG 2025 परीक्षेच्या महत्त्वाच्या तारखा

पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यापीठात प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी https://exams.nta.ac.in/CUET-PG/ या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.

·       अर्जाची सुरुवात: 2 जानेवारी 2025

·       अर्ज करण्याची शेवटची तारीख: 1 फेब्रुवारी 2025

·       शुल्क भरण्याची शेवटची तारीख: 2 फेब्रुवारी 2025

·       अर्जात दुरुस्त करण्याची अंतिम तारीख: 3-5 फेब्रुवारी 2025

·       परीक्षेची तारीख: 13-31 मार्च 2025

उमेदवार CUET PG परीक्षेसाठी (CUET PG 2025 registration Process) कसा अर्ज करू शकतात?

CUET PG परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट Exams.nta.ac.in/CUET-PG/ ला भेट द्यावी लागेल. वेबसाइटवर गेल्यानंतर CUET PG 2025 नोंदणी या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर माहिती भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. आता तुम्हाला इतर माहिती व कागदपत्रे अपलोड करावी लागतील. त्यानंतर शुल्क भरून अर्ज सबमिट करा. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काहीदिवस आधी हॉल तिकीट उपलब्ध होईल.

CUET PG परीक्षेविषयी महत्त्वाच्या बाबी

एनटीएद्वारे परीक्षा घेण्याच्या पद्धतीत मोठा बदल करण्यात आला आहे. आता CUET PG परीक्षा कॉम्प्युटरवर आधारित असेल. ही परीक्षा 157 विषयांसाठी आयोजित केली जाणार आहे. तसेच, 312 शहरांमध्ये याचे आयोजन केले जाईल. प्रश्नपत्रिका हिंदी व इंग्रजी या दोन भाषेत असेल. तसेच, उमेदवारांनी भाषा आधारित विषयांच्या माहितीसाठी संबंधित विद्यापीठ आणि NTA ची वेबसाइट पाहावी. परीक्षेत नेगेटिव्ह मार्किंगचाही समावेश आहे.

विद्यार्थी कोणतीही समस्या असल्यास NTA चा हेल्पलाइन क्रमांक 011- 40759000 / 011 – 69227700 अथवा helpdesk-cuetpg@nta.ac.in ईमेल वर संपर्क करू शकतात.