CTET Exam Date 2025 | सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट अर्थात CTET 2025 साठी एप्रिलपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर लवकरच याबाबतची सूचना प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी नियमितपणे वेबसाइटला भेट देणे गरजेचे आहे.
रिपोर्टनुसार, CTET 2025 ची संभाव्य परीक्षा तारीख 6 जुलै असण्याची शक्यता आहे. CTET बद्दल सांगायचे तर ही एक राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आहे, जी प्राथमिक (1 ते 5) आणि माध्यमिक (6 ते 8) वर्गांमध्ये शिक्षकांची पात्रता निश्चित करण्यासाठी दरवर्षी जुलै आणि डिसेंबर महिन्यात दोन वेळा आयोजित केली जाते.
CTET 2025 परीक्षेची तारीख
या वर्षासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (CBSE) CTET परीक्षेचे जुलै महिन्यात आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. अर्ज प्रक्रिया एप्रिल महिन्यात सुरू होईल. याबाबत एप्रिल महिन्यातच अधिकृत अधिसूजना जारी केली जाईल.
त्यानंतर जुलै सत्रासाठी CTET 2025 परीक्षा 6 जुलै 2025 रोजी आयोजित केली जाऊ शकते. मात्र, अद्याप अधिकृत वेबसाइटवर याबाबतची माहिती प्रसिद्ध झालेली नाही.
CTET 2025 परीक्षा पॅटर्न
CTET परीक्षेत दोन पेपर असतात. पेपर I त्या उमेदवारांसाठी आयोजित केला जातो जे इयत्ता 1 ते 5 पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण्यास इच्छुक असतात. तर पेपर II त्यांच्यासाठी घेतला जातो जे इयत्ता 6 ते 8 पर्यंत शिकवू इच्छितात. CTET 2025 परीक्षा विविध परीक्षा केंद्रांवर दोन सत्रांमध्ये ऑफलाइन पद्धतीने आयोजित केली जाईल. केंद्र सरकारच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी CTET परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
CTET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी, सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना 60% किंवा त्याहून अधिक गुण (म्हणजे 150 पैकी 90 गुण) मिळवावे लागतील. इतर राखीव प्रवर्गातील (OBC, SC, ST) उमेदवारांसाठी हा निकष 82 गुण ठेवण्यात आला आहे.