परभणी- राज्यात २४ ऑक्टोबर पासून मान्सून निघून जाणार आहे असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. पण १८ ऑक्टोबरला नांदेड, लातूर, परळी, धाराशिव, बीड, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कोकण पट्टी, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये भाग बदलत तुरळीक ठिकाणी पावसाचा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे.
परतीचा पाऊस जाता जाता १९,२०, आणि २१ ऑक्टोबर हे तीन दिवस मुसळधार पडणार आहे. हा पाऊस यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, परभणी, धाराशिव, जालना, जळगाव, नाशिक या जिल्ह्यात पडणार आहे. तर २२ ऑक्टोबरपासून उत्तर महाराष्ट्रातून पाऊस निघून जाणार आहे आणि २४ तारखेनंतर राज्यातील सर्वच भागातून पाऊस निघून जाणार आहे. त्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.