BSNL चा खूपच शानदार रिचार्ज प्लॅन, फक्त 897 रुपयात मिळेल 6 महिन्यांची वैधता

BSNL Recharge Plans: टेलिकॉम कंपनी BSNL कडे कमी किंमतीत जास्त दिवसांच्या वैधतेसह येणारे अनेक शानदार प्लॅन्स उपलब्ध आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच ग्राहकांसाठी 897 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. 1 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या या प्लॅनची वैधता 180 दिवस आहे. म्हणजेच, ग्राहकांना फक्त दिवसाला 5 रुपये खर्च येतो. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फायद्यांविषयी सविस्तर जाणून घेऊया.

BSNL चा 897 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या 897 रुपयांच्या प्लॅनची वैधता 180 दिवस आहे. म्हणजेच, एकदा रिचार्ज केल्यानंतर पुढील 6 महिने पुन्हा रिचार्ज करण्याची गरज नाही. या प्लॅनमध्ये यूजर्सला दिवसाला फक्त 4.98 रुपये खर्च येतो. फक्त 4.98 रुपयात यूजर्सला अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा फायदा मिळतो.

BSNL च्या या प्लॅनमध्ये यूजर्सला संपूर्ण देशभरात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. याशिवाय, दररोज 100 मोफत एसएमएसचा देखील फायदा मिळतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 6 महिन्यांसाठी एकूण 90 जीबी डेटा दिला जातो. हा डेटा समाप्त झाल्यास यूजर्स 40 Kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता.

एअरटेल, जिओ आणि व्हीआयच्या तुलनेत BSNL चा हा प्लॅन खूपच स्वस्त आहे. या तिन्ही कंपन्यांच्या 90 दिवसांच्या मुदतीसह येणाऱ्या प्लॅनची किंमत जवळपास 600 रुपये आहे. मात्र, BSNL च्या 897 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 6 महिन्यांची मुदत मिळते.