Bank of India Recruitment 2025 | बँक ऑफ इंडियामध्ये (Bank of India) नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. बँकेने (BOI) 400 अप्रेंटिस (Apprentice Recruitment 2025) पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची मुदत 15 मार्चपर्यंत होती. मात्र, आता ही मुदत वाढवण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवार अप्रेंटिस पदासाठी आता 28 मार्च 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. बँकेच्या अधिकृत वेबसाइट (Bank of India Official Website) वरून या पदांसाठी अर्ज करता येईल.
पात्रता
अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवी (Graduate Degree) असणे आवश्यक आहे. ही पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा केंद्र सरकारने मान्य केलेल्या समकक्ष संस्थेतून घेतलेली असावी. तसेच, ही पदवी 1 एप्रिल 2021 ते 1 जानेवारी 2025 दरम्यान मिळवलेली असावी.
वयोमर्यादेबद्दल सांगायचे तर, 1 जानेवारी 2025 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे. म्हणजेच, उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 1997 ते 1 जानेवारी 2005 या कालावधीत (दोन्ही तारखांसह) झालेला असावा.
निवड प्रक्रिया
भरती प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. यामध्ये ऑनलाइन परीक्षा (Online Exam) आणि स्थानिक भाषेचे परीक्षण याचा समावेश असेल.
परीक्षा पद्धत
ऑनलाइन परीक्षेमध्ये एकूण 100 बहुपर्यायी प्रश्न असतील. ही परीक्षा 100 गुणांची असेल. परीक्षेसाठी एकूण 90 मिनिटांचा वेळ दिला जाईल. या परीक्षेत सामान्य ज्ञान (General Awareness), इंग्रजी भाषा (English Language), गणित व तर्कशक्ती (Quantitative & Reasoning Aptitude) आणि संगणक ज्ञान (Computer Knowledge) या विषयांचा समावेश असेल.
लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना स्थानिक भाषेच्या चाचणीत पात्र ठरणे आवश्यक आहे. उमेदवाराने अर्ज करत असलेल्या राज्यातील किमान एक स्थानिक भाषा वाचणे, लिहिणे, बोलणे आणि समजणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क
अर्ज शुल्क श्रेणीनुसार वेगवेगळे आहे. PwBD उमेदवारांसाठी शुल्क 400 रुपये, SC/ST तसेच सर्व महिला उमेदवारांसाठी 600 रुपये आणि इतर उमेदवारांसाठी 800 रुपये आहे. अर्ज भरताना हे शुल्क ऑनलाइन भरावे लागेल.
इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट (Bank of India Online Application) ला भेट देऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.