एटीएममधून पैसे काढणं महागणार, 1 मे पासून द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क

ATM Withdrawals

ATM Withdrawals To Get Costlier | एटीएममधून (ATM Withdrawals) रोख पैसे काढणे आता महाग होणार आहे. 1 मे पासून एटीएममधून पैसे काढताना अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. याचे कारण म्हणजे आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) इंटरचेंज शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे जे ग्राहक आर्थिक व्यवहारांसाठी एटीएमवर अवलंबून असतात, त्यांनी त्यांच्या विनामूल्य व्यवहार मर्यादेपेक्षा जास्तवेळा एटीएमचा वापर केल्यास त्यांना अतिरिक्त शुल्क (RBI raised interchange fees) भरावे लागेल. 

समजा, जर बँक A चा ग्राहक बँक B च्या एटीएममधून पैसे काढतो, तर निशुल्क मासिक मर्यादा ओलांडल्यानंतर त्याच्या बँकेकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. मेट्रो शहरांमध्ये ग्राहकांना पाच आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये तीन मोफत व्यवहारांची मर्यादा दिली जाते. 

एटीएम इंटरचेंज शुल्क म्हणजे एका बँकेने दुसऱ्या बँकेला त्यांच्या एटीएम सेवांसाठी दिलेले शुल्क असते. हे शुल्क सहसा प्रत्येक व्यवहारासाठी निश्चित रक्कम असते. हे ग्राहकांकडून बँकिंग शुल्काच्या स्वरूपात घेतले जाते.

रिझर्व्ह बँकेने आर्थिक व्यवहारांसाठी (ATM Withdrawals new charges) एटीएम इंटरचेंज शुल्कात 2 रुपयांनी वाढ केली आहे. तर  गैर-आर्थिक व्यवहार जसे की, बॅलेन्स तपासणे यासाठी 1 रुपय वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे रोख रक्कम काढण्याचे शुल्क प्रति व्यवहार 17 रुपयांवरून 19 रुपये होईल, तर बॅलन्स चेक करण्याचे शुल्क प्रति व्यवहार 6 रुपयांवरून 7 रुपये होईल.

जे ग्राहक वारंवार इतर बँकांच्या एटीएमचा वापर करतात, त्यांच्यावर याचा परिणाम होणार आहे. ही शुल्कवाढ संपूर्ण देशभर लागू होणार आहे. लहान बँकांच्या ग्राहकांना याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. कारण या बँका मोठ्या आर्थिक संस्थांच्या एटीएम यंत्रणेवर आणि संबंधित सेवांवर अवलंबून असतात, त्यामुळे वाढलेल्या खर्चाचा त्यांच्यावर अधिक परिणाम होऊ शकतो.