अनंत अंबानींनी दुप्पट किंमत देऊन विकत घेतल्या 250 कोंबड्या, कारण काय? जाणून घ्या

Anant Ambani Viral Video | उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी (Anant Ambani) यांनी त्यांच्या 30 व्या वाढदिवसापूर्वी जामनगर ते द्वारका (Jamnagar to Dwarka) अशी पवित्र पदयात्रा सुरू केली आहे. या पदयात्रेदरम्यान अनंत अंबानींच्या एका कृतीने सर्वांचेच लक्ष वेधले. पदयात्रेदरम्यान त्यांना वाटेत ट्रक कोंबड्यांना कत्तलखान्यात घेऊन चालला असल्याचे दिसले. यावेळी अनंत यांनी स्वतः पुढे येऊन या कोंबड्या खरेदी करत त्यांचे प्राण वाचवले. 

गेल्या 5 दिवसांपासून अनंत अंबानी रोज 10 ते 12 किलोमीटरचा पायी प्रवास करत आहेत. त्यांच्या सोबत कडक सुरक्षा व्यवस्था देखील आहे. 10 एप्रिलला असलेल्या वाढदिवसापूर्वी द्वारकेतील द्वारकाधीश मंदिरात दर्शन घेणे हे त्यांच्या पदयात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे. 

व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये अनंत अंबानी एका गाडीजवळ उभे असलेले दिसत आहेत, ज्यामध्ये अनेक कोंबड्या आहेत. त्यांच्या हातात एक कोंबडी आहे आणि सुरक्षा रक्षकांद्वारे वेढलेले असतानाही, अनंत अंबानी कॅमेऱ्याबाहेर असलेल्या व्यक्तीला सर्व कोंबड्यांना वाचवण्याचे आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे निर्देश देत आहेत. त्याचबरोबर, या कोंबड्यांसाठी ते दुप्पट किंमत देखील देतात व त्यांचे स्वतः पालन करणार असल्याचे म्हणताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

दरम्यान, अनंत अंबानीच्या पदयात्रेदरम्यानमार्गावर असलेल्या मंदिरांमध्ये थांबून प्रार्थना करतात आणि पुढील प्रवासासाठी आशीर्वाद घेत आहेत. जामनगर ते द्वारका हे अंतर 140 किलोमीटरपेक्षा अधिक आहे, आणि अनंत अंबानींनी आतापर्यंत 60 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार केले आहे. 

अनंत अंबानी हे त्यांच्या प्राणीप्रेमासाठी प्रसिद्ध आहेत. रिलायन्स जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्समध्ये त्यांनी सुरू केलेले ‘वनतारा’ (Vantara) प्राणी बचाव केंद्र हे एक महत्त्वाचे कार्य आहे, ज्यामध्ये बचावलेल्या प्राण्यांना आश्रय दिला जातो. भारत सरकारने त्याला ‘कॉर्पोरेट’ श्रेणीतील सर्वोच्च ‘प्राणी मित्र’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला आहे.