Jolly LLB 3 Release Date | अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अरशद वारसी (Arshad Warsi) यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘जॉली एलएलबी 3’ (Jolly LLB 3) ची रिलीज तारीख अखेर समोर आली आहे. यापूर्वी ‘जॉली एलएलबी’ (2013) आणि ‘जॉली एलएलबी 2’ (Jolly LLB ) (2017) या दोन भागांनी प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. त्यानंतर आता निर्मात्यांनी निर्माते ‘जॉली एलएलबी 3’ घेऊन येत आहे.
हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. वायकॉम18 स्टुडिओ आणि स्टार स्टुडिओने या चित्रपटाच्या रिलीजची माहिती दिली आहे. या चित्रपट फ्रेंचाईजीच्या पहिल्या भागात अरशद वारसी मुख्य भूमिकेत होता, तर दुसऱ्या भागात अक्षय कुमारने जॉलीची भूमिका साकारली होती. आता तिसऱ्या अभिनेता अक्षय कुमार आणि अरशद वारसी एकत्र काम करताना दिसणार आहेत.
‘जॉली एलएलबी 3’मध्ये अक्षय कुमार ‘जॉली मिश्रा’ आणि अरशद वारसी ‘जॉली त्यागी’ यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात दोन्ही जॉलींमधील कायदेशीर लढाई पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा भारतीय न्यायव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे, जी पहिल्या दोन भागांप्रमाणेच प्रेक्षकांना मनोरंजनासोबतच विचार करायला भाग पाडेल. यात हुमा कुरेशी आणि सौरभ शुक्ला यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असतील. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष कपूर हे आहेत.
‘जॉली एलएलबी’चा पहिला भाग 2013 मध्ये रिलीज झाला होता. 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने 43 कोटी रुपयांचा गल्ला कमावला होता. तर, चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अरशद वारसीच्या जागी अक्षय कुमारची प्रमूख भूमिका होती. 45 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने 112 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. या ‘जॉली एलएलबी 3’ बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.