Airtel IPTV Plans : एअरटेलने सुरू केली खास नवीन सेवा, 350 टीव्ही चॅनेल्स-30 ओटीटीसह मिळेल हाय-स्पीड इंटरनेटचा फायदा

Airtel IPTV Plans | टेलिकॉम कंपनी एअरटेलने (Airtel) भारतातील 2,000 शहरांमध्ये आपली IPTV (इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन) सेवा सुरू केली आहे. या सेवेंतर्गत ग्राहकांना आता नेटफ्लिक्स, अ‍ॅपल टीव्ही+, अ‍ॅमेझॉन प्राइम, सोनीलिव्ह आणि झी5 यांसारख्या 29 प्रमुख स्ट्रीमिंग अ‍ॅप्सवरील ऑन-डिमांड कंटेंटची मोठी लायब्ररी मिळेल. 

यासोबतच IPTV प्लॅन्समध्ये (Airtel IPTV Plans) 350 लोकप्रिय टीव्ही चॅनेल आणि वाय-फाय सेवाही उपलब्ध असेल. या नवीन IPTV प्लानची किंमत 699 रुपये पासून सुरू होते.

आयपीटीव्ही (Airtel IPTV Service) सोबत एअरटेलने एका ऑफरची देखील घोषणा केली आहे. जे यूजर्स एअरटेल थँक्स अॅपद्वारे कोणताही प्लॅन खरेदी करतील त्यांना 30 दिवसांपर्यंत मोफत आईपीटीव्हीचा आनंद घेऊ शकतात. सर्व नवीन एअरटेल ग्राहक नवीन एअरटेल वाय-फाय प्लॅन खरेदी केल्यावर आईपीटीव्हीचा आनंद घेऊ शकतात. ग्राहक एअरटेलच्या वेबसाइटवरून हा प्लॅन खरेदी करू शकतात.

एअरटेलच्या नवीन आयपीटीव्ही प्लॅन्सची किंमत 699 रुपयांपासून सुरू होते. तर सर्वात महागड्या प्लॅनची किंमत 3,999 रुपये आहे. 

एयरटेलचा 699 रुपयांचा प्लॅन

हा एक वाय-फाय प्लॅन असून याची वैधता 30 दिवसांची आहे. या एयरटेल प्लॅनमध्ये 40mbps इंटरनेट स्पीड मिळेल. याशिवाय, ग्राहकांना 350 रुपयांच्या टीव्ही चॅनलसह डीटीएच (डायरेक्ट-टू-होम) कनेक्शन देखील मिळते. यात JioHotstar, Zee5 सह 26 ओटीटी अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते.