Akshay Kumar sells two flats in Mumbai | बॉलिवूड कलाकार अभिनयासोबतच इतर क्षेत्रातही सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. काहीजण स्वतःचे रेस्टोरंट सुरू करतात, तर काहीजण रियल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करतात. अनेक कलाकार रियल इस्टेट (Mumbai Property) क्षेत्रातील गुंतवणुकीच्या माध्यमातून प्रचंड नफा कमवतात. आता अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) देखील मुंबईतील दोन लग्झरी फ्लॅट्सची विक्री केल्यामुळे चर्चेत आला आहे.
अक्षय कुमारने मुंबईच्या बोरिवली येथील ओबेरॉय स्काय सिटी (Oberoi Sky City) प्रोजेक्टमधील त्याचे दोन अपार्टमेंट एकूण 6.6 कोटी रुपयांना विकले. हे दोन्ही व्यवहार काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले.
रिपोर्टनुसार, अक्षय कुमारने एका अपार्टमेंटची 5.35 कोटी रुपयांनी विक्री केली. या अपार्टमेंटला त्याने नोव्हेंबर 2017 मध्ये 2.82 कोटी रुपयांना खरेदी केले होते. या व्यवहारात अक्षयला 89% पेक्षा जास्त नफा झाला. या अपार्टमेंटचा कार्पेट एरिया 1,080 चौरस फूट आहे. या विक्रीवर 32.1 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरले.
अक्षय कुमारने याच प्रोजेक्टमधील आणखी एक अपार्टमेंटची 1.25 कोटी रुपयांना विक्री केली.2017 मध्ये या अपार्टमेंटला 67.19 लाख रुपयांना खरेदी केले होते. या संपत्तीच्या किंमतीत 86% वाढ झाली आहे. म्हणजेच, या दोन्ही अपार्टमेंटच्या विक्रीतून अक्षयला जवळपास 3 कोटींपेक्षा अधिक नफा झाला आहे.
दरम्यान, ओबेरॉय स्काय सिटी हे सेलिब्रेटींना रियल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचे लोकप्रिय ठिकाण बनले आहे. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी देखील मे 2024 मध्ये याच प्रोजेक्टमध्ये अनेक मालमत्ता खरेदी केल्या होत्या.