मुंबई
८ जूनपासून महाराष्ट्रात पावसाचे आगमन होणार असून, २२ जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तविला आहे. २७, २८ जूनला सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या दिसतील. जूनपेक्षा जुलै महिन्यात जास्त पाऊस आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर मध्येही जास्त पाऊस येणार असल्याचा अंदाजही त्यांनी वर्तविला.
त्यानंतर १६, १७, १८ एप्रिलला राज्यात पुन्हा पावसाचे वातावरण होणार आहे. त्याचबरोबर मे महिन्यातही दोनदा अवकाळी पाऊस पडणार, असेही डख यांनी सांगितले.