6,7,8 मे मुसळधार पाऊस कोकण, प. महाराष्ट्राला झोडणार

मुंबई – शेतीविषयक हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितले की, 6, 7 व 8 मे असे तीन दिवस पश्‍चिम व दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणपट्टीत मुसळधार पाऊस आणि गारपीट होणार आहे.
पंजाबराव डख म्हणाले की, विदर्भ आणि मराठवाड्यात 4,5,6 मे असे तीन दिवस चांगला पाऊस पडेल. त्यानंतर 6,7 व 8 मे असे तीन दिवस पश्‍चिम व दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणपट्टीत मुसळधार पाऊस व गारपीट होईल. पुणे, नगर, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सोलापूरसह कोकणाला पाऊस झोडपून काढेल. तेव्हा आंबा शेतकर्‍यांनी झाडावरून आंबे काढून घ्यावे. 9 ते 16 मे ऊन पडेल आणि 18, 19 मे हवामान बदलेल.
यंदा जुलै, ऑगस्टमध्ये चांगला पाऊस पडेल असे सांगत डख म्हणाले की, 8 जूनला पावसाळ्याचे आगमन होईल. 8 व 9 जून आणि 16 व 17 जूनला पाऊस होईल. त्यानंतर 22 जूनला व्यापक पाऊस होईल. त्यानंतर 10 ते 15 जुलै पाऊस पडेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top