Lava ने भारतीय बाजारात अवघ्या 6 हजार रुपयांच्या बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने ग्राहकांसाठी Lava Yuva Smart स्मार्टफोनला लाँच केला आहे. अगदी कमी किंमतीत येणाऱ्या या फोनमध्ये अनेक शानदार फीचर्स देण्यात आलेले आहे. नियमित कामे करण्यासाठी हा फोन एक चांगला पर्याय आहे.
Lava Yuva Smart चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Lava Yuva Smart मध्ये 6.75 इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डीस्प्ले 60Hz रिफ्रेश रेट्स आणि 20:9 आस्पेक्ट रेश्योसह येतो. फोनमध्ये UNISOC 9863A चिपसेटसह 3 जीबी रॅम दिली आहे. फोनमध्ये 3 जीबी व्हर्च्युअल रॅम देखील मिळेल. अशाप्रकारे ग्राहकांना फोनमध्ये एकूण 6 जीबी रॅम दिली आहे. तसेच, 64 जीबी स्टोरेजचा पर्याय मिळतो. लावाचा हा फोन Android 14 Go Edition वर काम करतो.
लावाच्या या फोनमध्ये सेल्फीसाठी 5MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी रियरला ड्यूल कॅमेरा सेंसर मिळेल. यामध्ये एलईडी फ्लॅश लाइटसह 13 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि एआय सेकेंडरी कॅमेरा दिला आहे. यात 10W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी दिली आहे.
Lava Yuva Smart ची किंमत
Lava Yuva Smart ला ग्राहक फक्त 6 हजार रुपयात खरेदी करू शकतात. हा फोन 1 वर्षाच्या वॉरंटीसह येतो. फोनला Glossy Blue, Glossy White आणि Glossy Lavender रंगात खरेदी करू शकता.