POCO X6 Neo 5G Offer: कमी बजेटमध्ये चांगले स्पेसिफिकेशन असलेला 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर POCO X6 Neo 5G हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. हा फोन सध्या लाँच किंमतीपेक्षा 5 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे. 11 हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या या फोनमध्ये 108 मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि फास्ट चार्जिंग सपोर्टसह अनेक फीचर्स दिले आहेत.
POCO X6 Neo 5G ची किंमत आणि ऑफर
कंपनीने Poco X6 Neo चे 8GB+128GB व्हेरिएंट 15,999 रुपये आणि 12GB+256GB व्हेरिएंट 17,999 रुपये किंमतीत लाँच केले होते. सध्या ई-कॉमर्स साइटवर Amazon वर 8GB+128GB व्हेरिएंट 11,999 रुपयात उपलब्ध आहे. फोनवर 1 हजार रुपये बँक ऑफर देखील उपलब्ध आहे. अशाप्रकारे, फोनला फक्त 10,999 रुपये किंमतीत खरेदी करू शकता. याशिवाय, फोनवर 11,350 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. हा फोन अॅस्ट्रल ब्लॅक, होरायझन ब्लू आणि मार्टियन ऑरेंज या तीन रंगांमध्ये येतो.
POCO X6 Neo 5G चे स्पेसिफिकेशन्स
पोकोच्या या फोनमध्ये 6.67-इंच (1080×2400 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले देण्यात आला असून, याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्स, 1,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस, 2160 हर्ट्ज टच सँपलिंग रेट आणि 1920 हर्ट्ज पल्स विड्थ मॉड्यूलेशन (PWM) डिमिंग आहे. यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आणि सेल्फी शूटरसाठी सेंट्रली अलाइन्ड होल पंच कटआउट दिले आहे.
फोनमध्ये 6 एनएम मीडियाटेक डाइमेंसिटी 6080 चिपसेट आणि माली G57 MC2 जीपीयू सह 8GB+128GB आणि 12GB+256GB स्टोरेज पर्याय मिळतो. यामध्ये फोटोग्राफीसाठी रियरला 108 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. तर सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट येणारी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.