जामिनाची रक्कम मान्य नाही!
विमानात गैरवर्तन करणारा तुरुंगात

नवी दिल्ली: एअर इंडियाच्या विमानामध्ये धूम्रपान आणि असभ्य वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या ३४ वर्षीय रमाकांत द्विवेदी या अमेरिकन नागरिकाला सोमवारी मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र जामिनासाठी २५,००० रुपये देण्यास नकार देत केवळ २५० रुपये दंड देणार असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यांनतर त्याची रवानगी मुंबईतील आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे.
लंडन ते मुंबई या फ्लाइट एआय-१३०मध्ये धुम्रपान केल्याबद्दल रमाकांत द्विवेदी या अमेरिकन नागरिकाला अटक करण्यात आली होती. फ्लाइटचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या प्रवाशाला मारले. प्रवाशाच्या या कृत्यावरून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. मात्र सोमवारी न्यायालयाने त्याला जमीन मंजूर केल्यानंतर जामीनासाठी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. मात्र जामिनाची रक्कम देण्यास त्याने नकार दिला. सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून फक्त २५० रुपये देणार असल्याचे त्याने सांगितले.
याचे कारण स्पष्ट करताना, द्विवेदी याने आपले वकील आणि पोलिसांना सांगितले भारतीय दंड संहितेच्या कलम ३३६ नुसार जामिनाची रक्कम २५० रुपये असावी याबाबतची माहिती इंटरनेटवर वाचली असल्याचे त्याने स्पष्ट केले. यासाठी पंचवीस हजार दंड भरणार नसल्याचे त्याने सांगितले. द्विवेदी याने जामिनाची रक्कम भरण्यापेक्षा तुरुंगात राहण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी रत्नाकर द्विवेदीची मुंबईतील आर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात आली.

Scroll to Top